मुंबई : जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांवर खटले दाखल करुन मोदींनी त्याची जम्मू-काश्मीरमधल्या सभांमध्ये जाहीर वाच्यता केली. काश्मीरी लोकांची मतं मिळवण्यासाठी काश्मीरी जनतेला सैनिकांवरील खटल्यांची माहिती दिली. मतांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारचे घाणेरडे राजकारण केले असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. आज शिवाजी पार्क येथे गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पाडवा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरे यानी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.
राज ठाकरे म्हणाले की, काश्मीरमध्ये दोन घुसखोरांवर सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांना नाईलाजास्तव गोळीबार करावा लागला होता. गोळी मारण्यापूर्वी जवानांनी त्या घुसखोरांना त्यांचे नावही विचारले. परंतु त्यांनी त्यांची कोणतीही ओळख दिली नाही. परिणामी जवानांनी त्यांना ठार केले. याप्रकरणी गोळीबार करणाऱ्या जवानांनवर कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले.
राज म्हणाले की, काश्मीरमधील जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी मोदींनी अनेकदा या कारवाईचा उल्लेख केला. जवानांना काश्मीरमधील समाजकंटकावर कारवाई करण्यापासून रोखले गेले. परिणामी अनेकदा समाजकंटकांनी जवानांवर हल्ले केले. परंतु त्यास प्रत्युत्तर देण्यापासून जवानांना रोखले. जवानांना समाजकंटकांनी मारहाण केल्याचे व्हिडीओदेखील राज ठाकरे यांनी आज त्यांच्या भाषणावेळी दाखवले. यावरुन राज यांनी मोदींवर जवानांच्या देशसेवेचे भांडवल केल्याचा आरोप केला आहे.
सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांवर खटले दाखल करुन मोदींनी मतांचं राजकारण केलं : राज ठाकरे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Apr 2019 10:33 PM (IST)
जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांवर खटले दाखल करुन मोदींनी त्याची जम्मू-काश्मीरमधल्या सभांमध्ये जाहीर वाच्यता केली. मतांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारचे घाणेरडे राजकारण केले असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -