नोटबंदी करताना मोदींनी पूर्ण कॅबिनेटला कोंडून ठेवले होते : राहुल गांधी
एबीपी माझा वेब टीम | 17 May 2019 04:03 PM (IST)
रेसकोर्स येथील आपल्या निवासस्थानी मोदींनी सगळ्या कॅबिनेटला कुलूप लावून कोंडले होते, असा खळबळजनक आरोप राहुल गांधींनी केला आहे.
Indian prime minister and Bhartiya Janta Party (BJP) leader Narendra Modi speaks during his public rally, ahead of fifth phase of central elections in Kaushambhi district of Uttar Pradesh , on May 1,2019. (Photo by Ritesh Shukla ) (Photo by Ritesh Shukla/NurPhoto via Getty Images)
सोलन (हिमाचल प्रदेश) : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा निर्णय घेताना आपल्या कॅबिनेटमधील मंत्र्यांना रेसकोर्स येथील घरात डांबून ठेवले होते, असं खळबळजनक वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केलं आहे. हिमाचल प्रदेशातील एका प्रचारसभेत बोलताना राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे. 'नरेंद्र मोदी यांनी आपल्या कॅबिनेटला नोटबंदीचा निर्णय घेताना रेसकोर्स येथील आपल्या निवासस्थानी कुलूप लावून कोंडले होते', असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. "हे खरं आहे, एसपीजी सुरक्षा पुरवणारे माझी पण सुरक्षा करतात त्यांनी मला हे सांगितलं आहे", असं राहुल गांधी पुढे म्हणाले. 8 नोव्हेंबर 2016 या दिवशी रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी चलनात असलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयावर अनेकांकडून टीका करण्यात येते. तसेच हा निर्णय घेताना पंतप्रधान मोदींनी कोणालाही विश्वासात न घेतल्याचा आरोपही त्यांच्यावर केला जातो. संबंधित बातम्या : लोकसभा निवडणूक 2019 : शेवटच्या दोन टप्प्यात मोदींनी नोटबंदी, जीएसटीवर बोलावं; प्रियांका गांधींचं आव्हान नोटबंदी स्वंतत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा : राज ठाकरे