Narayan Rane Exclusive | शिवसेना सोडण्याचं कारण नारायण राणे आत्मचरित्रात उलगडणार
एबीपी माझा वेब टीम | 04 May 2019 01:11 PM (IST)
उद्धव ठाकरे माझे दुश्मन नाहीत, फक्त वैचारिक मतभेद आहेत, असं स्पष्टीकरण नारायण राणेंनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत दिलं.
मुंबई : खासदार नारायण राणे यांचं आत्मचरित्र लिहून तयार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. आत्मचरित्रांतून अनेक गुपितं उघड करण्याचे संकेत राणेंनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिले आहेत. शिवसेना का सोडली यामागचं खरं कारण चरित्रात आहे. उद्धव ठाकरेंनी लोकांना कसा त्रास दिला, ते या चरित्रात लिहिलं आहे, असंही नारायण राणेंनी सांगितलं. शिवसेना, काँग्रेस आणि भाजप असा सर्व पक्षांमधील प्रवास लिहिल्याचं नारायण राणेंनी सांगितलं. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे माझे दुश्मन नाहीत, फक्त वैचारिक मतभेद आहेत, असं स्पष्टीकरण राणेंनी दिलं. VIDEO | अब आएगा मजा, सबका हिसाब होगा, नारायण राणे लिहिणार आत्मचरित्र भाजप प्रवेशामागची सर्व कारणं पडद्यावर येतील असं सांगतानाच शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंनी युती धर्म कुठे पाळला आहे? असा सवालही नारायण राणेंनी विचारला.