औरंगाबादजवळील दौलताबादच्या घाटामध्ये शेळके मामा हॉटेलजवळ दोन दिवसांपूर्वी एक अपघात झाला होता. यामध्ये जखमी झालेले दोन तरुण तडफडत होते. मला आडवं करा, अशी गयावया यापैकी एक युवक होता पण त्याच्या मदतीला कोणीही आलं नाही.
VIDEO | लोकांची बघ्याची भूमिका अपघातग्रस्ताच्या जीवावर | औरंगाबाद | एबीपी माझा
घटनास्थळी जमा झालेले लोक अपघातग्रस्त तरुणाचे फोटो आणि व्हिडिओ शूटिंग करत होते. त्या ठिकाणी काही महिलाही होत्या. मात्र अपघातग्रस्तांना पाहून एकाच्या पाषाण हृदयाला पाझर फुटला नाही. पोलिसांना फोन करावा, रुग्णालयाला कळवून अॅम्ब्युलन्स बोलवावी, किंवा गाडीतून जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं, असं एकालाही वाटलं नाही.
VIDEO | देवदर्शनावरुन परतताना भीषण अपघात, नववधूसह तिघांची मृत्यू | यवतमाळ
जवळपास दीड तास अपघातग्रस्तांचे फोटो आणि व्हिडिओ शूटिंग करत होते. या कालावधीत अपघातात जखमी असलेल्या सुमित कवडे याचा मृत्यू झाला. बघ्यांनी व्हिडिओ काढण्याऐवजी त्याला मदत केली असती, तर आज सुमित जिवंत असता, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.