मुंंबई :  महायुतीच्या विधानसभा जागावाटपात अडचणीचा ठरणाऱ्या मतदारसंघांपैकी एक असलेल्या  नाशिक जिल्ह्यातील   नांदगाव मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे वादाची ठिणगी पडली. शिवसेना एकनाथ  शिंदे गटाचे आमदार    सुहास कांदेना उमेदवारी दिल्यास काम करणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घेती आहे. नांदगांव - मनमाड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मुंबईत अजित पवारांच्या देवगिरी या निवासस्थानाबाहेर दाखल झाले आहे. भुजबळ साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है या घोषणांनी  परिससर दणाणून सोडला आङे. 


महायुतीत नांदगाव विधानसभा मतदारसंघावरून वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. "पक्ष सोडू पण सुहास कांदेचे काम करणार नाही ",अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्य कार्यकर्त्यांनी घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा देण्यात यावी ही मागणी करण्यासाठी जवळपास 400 ते 500 कार्यकर्ते  देवगिरी  या निवासस्थानी दाखल झाले आहे. नांदगावची   जागा राष्ट्रवादीला मिळावी अथवा शिवसेनेने उमेदवार बदलावा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.  महायुतीचे काम करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी नकार  दिला आहे.  


समीर भुजबळ कोणता पर्याय निवडणार?


छगन भुजबळांचे पुत्र  समीर भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाकडून नांदगाव विधानसभा लढण्यास इच्छुक असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. महायुतीत सध्या ही जागा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडे आहे. सुहास कांदे (Suhas Kande) हे सध्या नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. कांदे पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. आत  समीर भुजबळ अपक्ष लढणार की महाविकास आघाडीचा पर्याय निवडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  


ठाकरे आणि शरद पवार गटातील नेते समीर भुजबळांच्या संपर्कात : सूत्र


समीर भुजबळ सध्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल याच्या प्रतीक्षेत आहेत.   सध्या सुहास कांदे हे महायुतीचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे.   मात्र समीर भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.  उमेदवारी न मिळाल्यास भुजबळ इतर पर्यायांचा विचार करणार असल्याची माहिती सूत्रांनी  दिली आहे.  सध्या अपक्ष किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून लढता येईल का याची देखील चाचपणी भुजबळ यांच्याकडून सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.   महाविकासआघाडीतील ठाकरे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील  नेते  देखील समीर भुजबळ संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  


हे ही वाचा:


राज्यातील 288 मतदारसंघातील सर्वपक्षीय उमेदवारांची यादी; विधानसभेला मनसे अन् वंचितने घेतली आघाडी