महायुतीपुढे नवा पेच, भाजपाचा माजी आमदार नवी चूल मांडण्याच्या तयारीत, रत्नागिरी-संगमेश्वरसाठी उदय सामंतांची डोकेदुखी वाढणार?

रत्नागिरी संगमेश्वर या जागेवरून वाद चिघळण्याची शक्यता आहे. कारण भाजपाचे माजी आमदार या जागेवरून निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत.

Continues below advertisement

रत्नागिरी : महायुतीमधील (MahaYuti) जागावाटप जवळपास पूर्ण झाले आहे. काही जागांवरील चर्चा अद्याप बाकी असून तिही लवकरच मार्गी लागणार आहे. दरम्यान, महायुतीचे जागावाटप पूर्ण झाल्याचे म्हटले जात असले काही नेत्यांच्या भूमिकेमुळे महायुतीच्या घटकपक्षांची डोकेदुखी वाढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोकणातील रत्नागिरी-संगमेश्वर या जागेसाठी महायुतीत बेबनाव आहे. भाजपाचे (BJP) माजी आमदार बाळ माने (Bala Mane) हे या जेगावरून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. तिकीट न मिळाल्यास ते अपक्ष किंवा इतर पक्षाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Continues below advertisement

उदय समांतांच्या अडचणी वाढणार? 

सूत्रांच्या माहितीनुसार महायुतीत रत्नागिरी-संगमेश्वर या जागेचा प्रश्न अद्याप सुटला नाही. या जागेसाठी शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यामुळे बाळ माने हे सध्या अस्वस्थ आहेत. ते लवकरच वेगळी भूमिका घेण्याची शक्यता आहे. सामंतांना उमेदवारी मिळू सकते, मग आपण काय भूमिका घ्यायची? असा सवाल माने यांनी आपल्या समर्थक, मतदारांना केला आहे.

बाळा माने अपक्ष लढणार की ठाकरेंकडून तिकीट? 

बाळ माने हे रत्नागिरी संगमेश्वर या जागेसाठी ठाम आहेत. कोणत्याही परिस्थितीत ते या जागेवरून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे महायुतीत सामंत यांना ही जागा गेल्यास माने अपक्ष निवडणूक लढवणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे ही निवडणूक अपक्ष लढायची की अन्य पक्षाच्या चिन्हावर निवडणुकीला सामोरे जायचं, याबाबत माने यांची चर्चा चालू आहे. मिळालेल्या माहितीनुसार माने यांचा ठाकरे यांच्या शिवसेनेतेली प्रवेश सध्या होल्डवर आहे. ठाकरे यांनी त्यांच्या हाती शिवबंधन बांधल्यास ते रत्नागिरी संगमेश्वर या जागेवरून निवडणूक लढवू शकतात. तसे झाल्यास उदय सामंत आणि बाळ माने यांच्यात लढत होऊ शकते. ठाकरे यांनी प्रवेश नाकारल्यास ते उदय सामंत यांच्याविरोधात थेट अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भविष्यात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार . 

हेही वाचा :

मोठी बातमी! काँग्रेसचे 54 उमेदवार निश्चित, महत्त्वाची नावं 'एबीपी माझा'च्या हाती; अनेक बड्या नेत्यांना तिकीट

मोठी बातमी! महाविकास आघाडीचं ठरलं? आज संयुक्त पत्रकार परिषद घेणार, जागावाटपाची घोषणा करण्याची शक्यता

Eknath Shinde on Shrikant Pangarkar : गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीच्या प्रवेशामुळे शिंदे गटावर चारी बाजूंनी टीकेची झोड, आता एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola