Nanded Nagar Panchayat Election Results 2022 : राज्यातील विविध जिल्ह्यांतील नगरपंचायतीतील खुल्या 336 जागांवर मंगळवारी मतदान पार पडलं होतं. ज्यानंतर आज या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. दरम्यान सर्वाधिक जागांवर राष्ट्रवादीनं झेंडा फडकवला असून नांदेडमध्ये मात्र काँग्रेसची हवा दिसून आली. नांदेड जिल्ह्यातील नायगाव, अर्धापूर आणि माहूर या तीनही नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेसने घवघवीत यश प्राप्त केले. तर माहूर नगरपंचायतीत महाविकास आघाडीने यश मिळवल्याने एकंदरीत नांदेडच्या या सर्व नगरपंचायतीत काँग्रेसचा दबदबा दिसून आला.
काँग्रेसच्या या यशानंतर काँग्रेस पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमेदवारांचे पालकमंत्री व राज्याचे बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी अभिनंदन केले. मतदारांनी काँग्रेस पक्षाच्या विकासाच्या अजेंड्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी त्यांचाही आभारी असल्याचा आणि या निवडणूक निकालातून नांदेड जिल्हा काँग्रेस विचारधारा तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच मतदारांची ही साथ आमचा आत्मविश्वास व नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी आमच्या प्रयत्नांना बळ देणारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केलीय.
मागील निवडणूकीच्या तुलनेत निकाल
- नायगाव नगर पंचायतीमध्ये सर्वच्या सर्व 17 जागा काँग्रेसने जिंकल्या. तर मागील निवडणुकीत काँग्रेसच्या 13 जागा निवडून आल्या होत्या.
- अर्धापूर नगर पंचायतीत 17 पैकी 10 जागांवर विजय नोंदवून काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर मागील निवडणुकीतही काँग्रेसने 10 जागा जिंकल्या होत्या.
- माहूर नगर पंचायतीत काँग्रेसने मागील 3 जागांच्या तुलनेत यंदा 6 जागा जिंकल्या असून या ठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होऊ शकेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केलीय.
हे देखील वाचा-
- Sindhudurg Nagarpanchayat Election : कुडाळमध्ये नारायण राणेंना तर देवगडमध्ये नितेश राणेंना मोठा धक्का
- Karjat Nagarpanchayat Election : विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक जिंकली; आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया
- Raigad Nagarpanchayat Election : रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व