नांदेड : नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला असून माजी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे पराभूत झाले आहेत. अंतिम आकडेवारी हाती आली नसली तरी भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी जवळपास ४० हजाराहून अधिक मतांनी त्यांचा पराभव केला आहे. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यशपाल भिंगे यांनी दीड लाखाहून तसेच पराभवाची नैतिक जबाबदारी घेऊन अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी अशोक चव्हाण स्वतः निवडणूक लढविण्यास इच्छुक नव्हते. मात्र पक्षाचे आदेश आल्यानंतर त्यांनी मैदानात उडी घेतली होती. 2014 मध्ये झालेल्या 16 व्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत अशोक चव्हाण यांनी विजय मिळवला होता. त्यांना 4,93075 मतं मिळाली होती, तर त्यांचे विरोधक भाजपचे डी.बी.पाटील यांना 4,11,620 मतं मिळाली होती.
संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. 542 पैकी जवळपास साडेतीनशे जागांवर आघाडी मिळवत भाजपप्रणित एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. तर यूपीएचा अक्षरश: सुपडासाफ झाला आहे.
महाराष्ट्रात तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंधड्या झाल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीला सहाच जागा मिळवता आल्या. त्यापैकी काँग्रेसचा एकच उमेदवार आघाडीवर आहे. राज्यातील 48 जागांपैकी जवळपास 43 जागांवर विजयी आघाडी मिळवत, मागील लोकसभा निवडणुकीतील विक्रमही मागे टाकला आहे.
राज्यात काँग्रेसचं पतन होण्यामागे वंचित बहुजन आघाडीचा मोठा वाटा असल्याचं दिसून येत आहे. अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे मतांची विभागणी होऊन सर्वाधिक फटका आघाडीच्या विशेषत: काँग्रेसच्या उमेदवारांना बसला. नांदेडमध्ये देखील याच 'वंचित' फॅक्टरमुळे अशोक चव्हाणांसारख्या दिग्गज नेत्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासाठी पंतप्रधान मोदी यांची सभा झाली होती. तसेच राज ठाकरे यांची भाजप विरोधात सभा झाली होती. मात्र मोदींच्या सभेच्या प्रभावासमोर राज यांचा करिष्मा अपुरा पडला असल्याचे चित्र आहे.
काँग्रेसला मोठा धक्का : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा पराभव, 'वंचित'च्या फॅक्टरचा दणका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 May 2019 05:38 PM (IST)
नेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे मतांची विभागणी होऊन सर्वाधिक फटका आघाडीच्या विशेषत: काँग्रेसच्या उमेदवारांना बसला. नांदेडमध्ये देखील याच 'वंचित' फॅक्टरमुळे अशोक चव्हाणांसारख्या दिग्गज नेत्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -