Maharashtra Assembly Elections 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना राज्यभरात मोठीच चुरस रंगल्याचं दिसत आहे. दरम्यान या चुरशीच्या रणांगणावर विदर्भातील जागांवर लक्ष ठेवून असणाऱ्या ठाकरे गटाला आता ज्यासाठी केला होता अट्टाहास तेच धुळीस मिळालं, असं म्हणायची पाळी आल्याचं दिसतंय. पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांमधून शिवसेना ठाकरे गट पूर्णपणे हद्दपार झाला आहे.  नाना पटोलेंनी आपल्या बालेकिल्ल्यात ठाकरेंना जागा न देऊन मोठी राजकीय खेळी खेळल्याची चर्चा सुरु आहे. पूर्व विदर्भात 32 विधानसभा क्षेत्रांपैकी ठाकरे गटाला फक्त रामटेकची एकमेव जागा देऊन बोळवण केल्यानं आता पूर्व विदर्भात विधानसभेच्या जागांवर कशी लढत होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 


दरम्यान, याच मुद्यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य करत आपले मत व्यक्त केले आहे. शिवसेनेची नाराजी काय? ते त्यांचे (शिवसेना ठाकरे गट) व्यक्तिगत मत आहे. असे असेल तर आम्ही असं म्हणायचं का की कोकणात आम्हाला काहीच मिळालं नाही? आता हा विषय उरला नाही. संजय राऊत यांनी या सगळ्याला क्लोज केलं पाहिजे. विरोधकांसोबत आपल्याला लढायचंय, ही भूमिका त्यांनी घेतली पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं संजय राऊतांनी विरोधकांच्या बाबत भूमिका ठेवली पाहिजे, असे माझं मत असल्याचे नाना पटोले म्हणाले. 


भाजपमध्ये कपडे फाडने सुरू आहे- नाना पटोले 


जागावाटप हा शेवटच्या दिवसापर्यंत चालत असतात. अजूनही एक दोन जागेबद्दल महाराष्ट्रात निर्णय बाकी आहे. यावर हाय कमांड लक्ष घालत आहेत. तसेच मित्र पक्षासोबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे जागा वाटपाच्या समाप्तीकडे आम्ही चाललो आहोत. सोलापूरबाबत आमचे हायकमांड ने  निर्णय घेतलेला असून त्या बाबतीत चर्चा होईल, असं मला वाटत नाही. राज्य म्हणून आम्ही काही प्रतिक्रिया देणार नाही. मविआमध्ये जागावाटपचे विषय थोडे दिवस चालतील. मात्र भाजपमध्ये कपडे फाडत आहेत. ज्यांना तिकीट मिळाले नाही ते नाराज आहे, तर ज्यांना मिळाली तो आनंदात असतो. हे सगळे प्रक्रियेचे भाग आहे.असेही नाना पटोले म्हणाले.


ही वेळ महाराष्ट्राला वाचवण्याची -नाना पटोले


राष्ट्रीय पक्षांच्या सगळ्या आमच्या अलायन्स असतात ते सांभाळणं राष्ट्रीय पक्षाची जबाबदारी असते. या सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये कार्यकर्त्यांच्या वेदना आहेत, माझ्याही कार्यकर्त्या म्हणून आहे. मात्र अलायन्स हा महत्त्वपूर्ण भाग असतो. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना महायुतीने गाडलं, शिवाजी महाराजांनाही त्यांनी सोडलं नाही. थोरात यांच्या मुली बद्दलचे वक्तव्य आलं, हे महिलांचा अपमान असून भाजपचा पहिल्यापासूनच स्वभाव राहिला आहे. त्यामुळे अलायन्सचा विषय हा उद्यापर्यंत संपून जाईल. कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांना मी आवाहन करतो की, ही वेळ महाराष्ट्राला वाचवण्याची आहे. म्हणून एकत्र यावं आणि महाविकास आघाडीला निवडून द्यावं, असेही नाना पटोले म्हणाले 


हे ही वाचा