East Vidarbha Vidhansabha Election: राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना राज्यभरात मोठीच चुरस रंगल्याचं दिसत आहे. दरम्यान या चुरशीच्या रणांगणावर विदर्भातील जागांवर लक्ष ठेवून असणाऱ्या ठाकरे गटाला आता ज्यासाठी केला होता अट्टाहास तेच धुळीस मिळालं असं म्हणायची पाळी आल्याचं दिसतंय. पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांमधून शिवसेना ठाकरे गट पूर्णपणे हद्दपार झाला आहे.  नाना पटोलेनी आपल्या बालेकिल्ल्यात ठाकरेंना जागा न देऊन मोठी राजकीय खेळी खेळल्याची चर्चा सुरु आहे. पूर्व विदर्भात 32 विधानसभा क्षेत्रांपैकी ठाकरे गटाला फक्त रामटेकची एकमेव जागा देऊन बोळवण केल्यानं आता पूर्व विदर्भात विधानसभेच्या जागांवर कशी लढत होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


एकच जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार!


पूर्व विदर्भातील 32 जागांपैकी 23 जागी काँग्रेस, 8 जागी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तर फक्त 1 ठिकाणी शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढवत आहे..विशेष म्हणजे काँग्रेसचे उमेदवार पूर्व विदर्भातील सर्व सहा जिल्ह्यात निवडणुकीच्या मैदानात आहेत.


चंद्रपूर वगळता उर्वरित 5 जिल्ह्यात राष्ट्रवादी मैदानात


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार फक्त चंद्रपूर वगळता पूर्व विदर्भातील उर्वरित पाच जिल्ह्यात निवडणुकीच्या मैदानात आहेत. मात्र शिवसेना ठाकरे गटाला फक्त नागपूर जिल्ह्यात रामटेकमध्ये प्रतिनिधित्व मिळाले आहे.. वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या पाचही जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला एकही जागा सोडण्यात आलेली नाही.


विदर्भात कशी आहे लढत?


नागपूर जिल्ह्यातील विधानसभा


१) उत्तर नागपूर : काँग्रेस 
२) दक्षिण नागपूर : काँग्रेस 
३) पश्चिम नागपूर : काँग्रेस
४) दक्षिण पश्चिम नागपूर : काँग्रेस 
५) मध्य नागपूर : काँग्रेस 
६) पूर्व नागपूर : राष्ट्रवादी - काँग्रेस शरदचंद्र पवार 


७) हिंगणा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार 
८) काटोल : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार 
९) उमरेड : काँग्रेस
१०) रामटेक : शिवसेना ठाकरे गट 
११) कामठी : काँग्रेस 
१२) सावनेर : काँग्रेस 


12 पैकी 8 ठिकाणी काँग्रेस, 3 ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गट, 1 ठिकाणी शिवसेना ठाकरे गट


गोंदिया जिल्हा


१) गोंदिया : काँग्रेस 
२) मोरगांव अर्जुनी : काँग्रेस 
३) तिरोडा : राष्ट्रवादी शरद पवार गट 
४) देवरी-आमगाव : काँग्रेस 


 गोंदियात 3 ठिकाणी काँग्रेस तर 1 ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, तर शिवसेना ठाकरे गट 0
--------------------------------------


 भंडारा जिल्हा


१) तुमसर-मोहाडी : राष्ट्रवादी शरद पवार गट 
२) भंडारा-पवनी : काँग्रेस 
३) साकोली : काँग्रेस


2 ठिकाणी काँग्रेस तर 1 ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, शिवसेना ठाकरे गट 0 
------------------------------------


गडचिरोली जिल्हा


१) गडचिरोली : काँग्रेस 
२) अहेरी : राष्ट्रवादी शरद पवार 
३) आरमोरी : काँग्रेस


2 ठिकाणी काँग्रेस 1 ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष तर शिवसेना ठाकरे गट 0
--------------------------------------


 चंद्रपूर जिल्हा


१) चंद्रपूर : काँग्रेस
२) वरोरा : काँग्रेस
३) चिमुर : काँग्रेस
४) ब्रम्हपुरी : काँग्रेस
५) बल्लारपूर : काँग्रेस
६) राजुरा : काँग्रेस 


6 ठिकाणी काँग्रेस तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गट 0.. 
--------------------------------------


वर्धा जिल्ह्यातील विधानसभा 


१) वर्धा : काँग्रेस 
२) हिंगणघाट : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 
३) देवळी : काँग्रेस 
४ आर्वी : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष


2 ठिकाणी काँग्रेस तर 2 ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना ठाकरे गट 0