Nana Patole on Devendra Fadnavis : भंडारा विधानसभेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी नाना पटोले हे आज भंडाऱ्यात हेलिकॉप्टरने दाखल झाले. शहापूर इथं हेलिकॉप्टरमधून उतरताच त्यांच्या बॅग चेकिंग करण्यात आल्या. यवतमाळ इथं नाना पटोले यांच्या सोबत काहीही नसलं तरी त्यानंतरच्या प्रवासादरम्यान त्यांनी भंडाऱ्याकडे प्रस्थान करताना हेलिकॉप्टरमध्ये भोजन केलं. त्यामुळं त्यांच्या हेलिकॉप्टरमधील बॅगमध्ये पथकाला भोजन करण्याच्या प्लास्टिकच्या प्लेट्स आणि औषधी मिळाली. यावेळी नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला.


मला देवेंद्र फडणवीसची कीव येते


नाना पटोले म्हणाले की, मला तर देवेंद्र फडणवीसचीच कीव येते. अमित शाह, नरेंद्र मोदी आणि योगींच्याही हेलिकॉप्टर उतरल्यानंतर बॅगची तपासणी व्हायला पाहिजे. नियम सगळ्यांसाठी सारखा आहे. मग, नियम सगळ्यांसाठी सारखा असेल तर त्यांच्या बॅग का तपासल्या जात नाही? मागील काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नाशिकमध्ये ज्या बॅग दिसत होत्या त्या बॅगा कशाच्या होत्या? आणि म्हणूनच हेतूपुरस्सर विरोधकांना टार्गेट करायचा प्रयत्न सत्तेच्या जोरावर भाजप करीत असेल तर या पद्धतीची भूमिका मांडणे चुकीची आहे असं म्हणत असेल तर, देवेंद्र फडणवीसचीचं कीव येते. शेतकरी, बेरोजगारी आणि महागाई हे तीन मुद्दे काँग्रेसचे आहेत, असं म्हणत नाना पटोले यांनी हेलिकॉप्टरमधील बॅग तपासणीवरून देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला नाना पटोले यांनी प्रत्युत्तत्तर दिलं. 


बावनकुळेंनी भाजपला लाथ मारावी, भाजपची वकिली करू नये


ओबीसी समाजवाल्यांना भाजपवाले कुत्र म्हणतात आणि हा ओबीसी समाजाचा माणूस असून भाजपची वकिली करत असेल, तर त्या बावनकुळेंची कीव येते, खरंतर लाथ मारली पाहिजेल त्या भाजपला आणि ओबीसीच्या सर्व नेत्यांनी भाजपमधून बाहेर पडलं पाहिजे, असे ते म्हणाले. देशाचे प्रधानमंत्री हे स्वतःला ओबीसीचे नेते म्हणत असतील, मग ओबीसी समाजाला कुत्रं म्हणत असेल तर, नरेंद्र मोदीच्या बाबतीतही भाजपवाले हेच भूमिका बोलू शकतात, अशी टीका त्यांनी केली. 


इतर महत्वाच्या बातम्या