Nana Patole on Maharashtra CM : महायुती सरकारचा शपथविधी गुरुवारी (5 नोव्हेंबर) आझाद मैदानावर संपन्न झाला. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ घेतली. महायुतीच्या या शपथविधी सोहळ्याला 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे यांना यांच्यासह इतर पक्षातील महत्वाच्या नेत्यांनाही या सोहळ्यासाठी आमंत्रण देण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान याच मुद्यावर भाष्य करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आपल्या शपथविधी सोहळ्यातील अनुपस्थिति बद्दल स्पष्टोक्ती दिली आहे. 


शपथविधी सोहळ्यातील आमंत्रणाचा निरोप कोणाला दिला याची माहिती मला नाही. निरोप असता तर मी गेली असतो. आम्हाला कधीच बोलावले नाही. माझे मित्र मुख्यमंत्री झाले त्यांना माझ्या शुभेच्छा. आता महाराष्ट्राच्या समस्या दूर व्हाव्यात, अशी अपेक्षा आहे. कंत्राटी भरती आम्ही बंद करू असे फडणवीस म्हणाले होते. आता शिक्षकांच्या कंत्राटी भरती त्यांनी थांबवावी आणि नियमित शिक्षक भरती करावी. ग्रामीण भागात बस जात नाही. ग्रामीण भागात बससेवा बंद करत आहे का, असा प्रश्न पडला आहे. बस सेवा पूर्ववत करावी. शेतकऱ्यांची कर्ज माफी करावी. धान, सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या. असे म्हणत नाना पटोले यांनी आपल्या अपेक्षा नव्या सरकारकडे व्यक्त केल्या आहे.


फडणवीस या मित्राकडून आमच्या अपेक्षा आहे- नाना पटोले 


राज्याची कायदा सुव्यवस्था सुधारावी. फडणवीस यांना गृह विभागाचा मोठा अनुभव आहे. गृह विभाग त्यांच्याकडेच राहील, अशी आमची अपेक्षा आहे. महाराष्ट्र ड्रग्समुक्त करावे. आधीच सरकार स्थापन व्हायला एवढे दिवस लागले. भाजप आणि त्यांचे सोबती हे संविधान पलीकडचे लोक आहे. शपथविधीची तारीख राज्यपाल जाहीर करतात, मात्र यावेळेला यांनीच घोषणा केली. आपण त्यात पडू नये. फडणवीस या मित्राकडून आमच्या अपेक्षा आहे. ते अनुभवी आहेत. असेही नाना पटोले म्हणाले. 


लोकांच्या मताच्या अधिकारावर डाका


मला बाकी भानगडीत जायचं नाही. आता सरकार निर्माण झाले आहे, आता सरकारने काम करावं. महायुतीच्या भांडणात आम्हाला जायचं नाही. महाराष्ट्राच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्या, हे आमचे उद्दिष्ट आहेत. त्यांच्यात काय लाथाड्या होत आहेत, त्याच्यात आम्हाला जायचं नाही. तुम्हीच मीडियामध्ये दाखवत आहात, काहींचे चेहरे हसरे आहे काहींचे चेहरे पडले आहे. Evm विरोधातला आवाज जनतेचा आहे, पक्षांचा नाही. आता संपूर्ण देशात evm चा घोळ चर्चेचा विषय झाला आहे.


मारकरवाडीने सरकारच्या मनात लपलेला मत चोरणारा डाकू सर्वांसमोर आणला आहे. तिथले लोक mock Poll करू इच्छित होते. मात्र सरकार ने ते करू दिले नाही, सरकार का घाबरले?  सरकारने त्या ठिकाणी मतदान का होऊ दिले नाही? पोलिसांच्या माध्यमातून सरकारने तिथे बूथ कॅपचरींग का केली? लोकांच्या मताच्या अधिकारावर डाका घातला जात आहे, अशी आता महाराष्ट्राची भावना झाली असल्याचे ही नाना पटोले म्हणाले.


हे ही वाचा