Vidarbha Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025 : राज्यभरातील नगरपरिषद, नगरपंचायतींचा निकाल (Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025) समोर आला आहे. आता राज्यातील विविध विजयी नगसेवक आणि नगराध्यक्षपदाच्या विजयी उमेदवारांची नावेही समोर आली आहे. याचदरम्यान राज्याचं लक्ष लागलेल्य नगरपरिषदेचा निकालही समोर आला आहे. अशातच राज्याचं लक्ष लागलेल्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम पिचवर भाजपनं नगरपरिषद, नगरपंचायतींसाठीची (Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025) निवडणुकीत दमदार कामगिरी केलीय. यात 27 पैकी 21 जागी भाजपने विजय मिळवला आहे. मात्र विदर्भात भाजपला मात्र निम्मं यश मिळालं आहे. तर काँग्रेसनेही एकूणच विदर्भात लक्षणीय यश मिळवल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकंदरीत विदर्भात नेमकं कुणाला यश मिळालं हे जाणून घेऊ.

Continues below advertisement

Vidarbha Nagarparishad-Nagarpanchayat Election Result : एकट्या विदर्भातून भाजपचे 50 नगरांध्यक्ष

नागपुरात नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र विदर्भातील तब्ब्ल 100 नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये भाजपाला निम्मं यश मिळाल्याचे चित्र आहे. ज्यामध्ये 100 नगरपरिषद, नगरपंचायतींत भाजपने 50 जागांवर विजय अथवा आघाडी मिळवली आहे. तर दुसरीकडे राज्यातील एकूण नगरांध्यक्षाची आकडेवारी लक्षात घेतली तर त्यापैकी 120 जागी भाजपला यश आले आहे. त्यापैकी एकट्या विदर्भातून 50 नगरांध्यक्ष हे निवडून आले आहे. त्यामुळे भाजपसाठी एकप्रकारे विदर्भ या निकालात महत्वाची भूमिका बजावत आहे. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेनेही विदर्भात 8, तर अजित दादांच्या राष्ट्रवादीने 4 जागांवर यश मिळवलं आहे. मात्र तुलनेने पश्चिम विदर्भात भाजपची काहीशी पिछाडी झाल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे विदर्भात 25 नगराध्यक्षांच्या जागांवर काँग्रेसने लक्षणीय यश मिळवले आहे.

Continues below advertisement

Vidarbha : विदर्भातील तब्ब्ल 100 नगरपरिषद, नगरपंचायतींत कुणाची हवा?

नागपूर जिल्हा 

सावनेर नगरपरिषद ( एकूण 21) 

नगराध्यक्ष - संजना मंगडे (भाजप)

भाजप 19नगर विकास आघाडी 2काँग्रेस 0

रामटेक नगरपरिषद

नगराध्यक्ष- बिकेंद्र महाजन  (शिवसेना) 

नगरसेवकशिवसेना - ८ भाजप - ५ कॅाग्रेस - ७

पारशिवनी नगरपंचायत 

नगरअध्यक्ष - सुनिता डोमकी (शिवसेना)

शिव सेना शिंदे - 7काँग्रेस -     5अपक्ष   - 4भाजप - 1

बहादूरा नगरपंचायत

नगराध्यक्ष - हेमलता ठाकूर (सावजी) भाजप 

नगरसेवक - भाजप- 13काँग्रेस - 2शिवसेना - 1अपक्ष - 1

खापा नगर परिषद (एकूण जागा 20)

नगराध्यक्ष -  पीयूष बोर्डे, भाजप

नगरसेवक - कांग्रेस;- १० भाजप:- ९अपक्ष:- १

मोहपा नगरपरिषद (एकूण जागा 20)

नगराध्यक्ष माधव चर्जन भाजप 10काँग्रेस 9अपक्ष 1

कळमेश्वर नगर परिषद (एकूण जागा 21)

नगराध्यक्ष - अविनाश माकोडे, भाजप

भाजप 15काँग्रेस 6

नागपूर नगराध्यक्ष विजयी उमेदवार

1)कळमेश्वर नगर परिषद - अविनाश माकोडे - भाजप.

2)सावनेर नगर परिषद - संजना मंगळे - भाजप.

3)रामटेक नगर परिषद - बिकेंद्र महाजन-  शिवसेना

4)मोहपा - माधव चर्जन - काँग्रेस

5) काटोल - अर्चना देशमुख, शेकाप, राष्ट्रवादी.

6) बुट्टीबोरी - सुमित मेंढे, गोंडवाना गणतंत्र, कॉंग्रेस समर्थीत.

7) खापा - पियुष बोरडे, भाजप, 

8) उमरेड - प्राजक्ता कारू, भाजप

9) भिवापूर - सुषमा श्रीरामे, भाजप.

10) कन्हान - राजेन्द्र शेंदे, भाजप.

11)मौदा   - भाजप- प्रसन्न तिडके- विजयी

12)कांन्द्री कन्हान - भाजप - सुजित पानतावणे

13)निलडोह - भाजप - भूमिका मंडपे,

14)येरखेडा - भाजप-  राजकिरण बर्वे, 

15)गोधनी - भाजप - रोशना कोलते, महिला

16) बेसा पिपळा - भाजप - कीर्ती बडोले

17)महादुला - भाजप हेमलता ठाकूर(सावजी)

18) बिडगाव - भाजप - विरु जामगडे, 

19) पारशीवनी - शिंदेंसेना - सुनीता डोमकी

ग़डचिरोली (3)गडचिरोली आरमोरी नगरपरिषद- नगराध्यक्षपदी भाजपचे रुपेश पुणेकर विजयीदेसाईगंज नगरपालिका- नगराध्यक्षपदी भाजपच्या लता सुंदरकर 741 मतांनी विजयीगडचिरोली नगरपरिषद-  नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणोती निंबोरकर 2600 मतांनी आघाडीवर

अमरावती (12)दर्यापूर - काँग्रेसच्या मंदा भारसाकळे विजयी..अचलपूर - भाजपच्या रूपाली माथने विजयीमोर्शी  - प्रतीक्षा गुल्हाने, शिवसेना शिंदे गट विजयी.. नांदगाव खंडेश्वर - प्राप्ती मारोडकर, शिवसेना ठाकरे गट विजयीचिखलदरा - काँग्रेसचे शेख  अब्दुल शेख हैदर विजयी..धारणी - भाजपचे सुनील चौथमल विजयी..चांदूर रेल्वे - बहुजन वंचित आघाडीच्या प्रियंका विश्वकर्मा विजयी...वरूड - भाजपचे ईश्वर सलामे विजयी...शेंदूरजना घाट - भाजपच्या सुवर्णा वरखेडे विजयी...अंजनगाव सुर्जी - भाजपचे अविनाश गायगोले यांचा विजय चांदूर बाजार - बच्चू कडू यांच्या प्रहारच्या मनीषा नांगलिया विजयी...

अकोला नगरपरिषद (6)

अकोला जिल्ह्यातील नगराध्यक्ष पदांच्या उमेदवारांची आघाडी आणि विजयी : (6)1) अकोट : भाजप : माया धुळे : विजयी 2) हिवरखेड : भाजप : सुलभा दुतोंडे : विजयी 3) मुर्तिजापूर : वंचित : शेख इमरान : आघाडी4) बाळापूर : काँग्रेस : डॉ. आफरीन : विजयी5) तेल्हारा : भाजप : वैशाली पालीवाल : विजयी6) बार्शीटाकळी : वंचित : अख्तरा खातून : विजयी

बुलढाणा- (एकूण नगर परिषद - 11)विजयी उमेदवार 1)सिंदखेड राजा - राष्ट्रवादी ( श. प.) - सौरभ तायडे. 2) लोणार - काँग्रेस - मीरा भूषण मापारी.3) खामगाव - भाजपा - अपर्णा फुंडकर.4) देऊळगाव राजा - राष्ट्रवादी (अ. प.) -  माधुरी शिपणे. 5) मलकापूर - काँग्रेस - अतिक जवारीवाले.6) नांदुरा - भाजपा - मंगला मुऱ्हेकर.7) जळगाव जामोद - भाजपा - गणेश दांडगे.8) बुलढाणा - शिवसेना (शिंदे ) - पूजा संजय गायकवाड.9) मेहकर - ठाकरे गट - किशोर गारोळे.10) शेगाव - काँग्रेस - प्रकाश शेगोकार.11) चिखली - भाजपा - पंडितराव देशमुख.

भंडारा जिल्हा :साकोली नगरपालिका निकाल- साकोली नगराध्यक्षपदी भाजपच्या देवश्री कापगते या विजयी झाल्यात

चंद्रपूर-  चिमूर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या गीता लिंगायत विजयीभाजप आमदार बंटी भांगडीया यांनी कायम राखला आपला गड

गोंदिया जिल्हा नगराध्यक्ष विजयी उमेदवार

1) गोंदिया नगरपरिषद -सचिन शेंडे - काँग्रेस 

2) तिरोडा नगरपरिषद - अशोक असाटी - भाजप 

3) गोरेगांव नगरपंचायत - तेजराम बिसेन - काँग्रेस 

4) सालेकसा नगरपंचायत - विजय पुंडे - काँग्रेस..

वाशिम 

नगर परिषद – रिसोडनगराध्यक्ष : भाजपएकूण नगरसेवक : 23भाजप : 09काँग्रेस : 08शिवसेना (शिंदे गट) : 05अपक्ष : 01

 नगर परिषद – मंगरूळपीरनगराध्यक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)एकूण नगरसेवक : 20भाजप : 10काँग्रेस : 01शिवसेना (शिंदे गट) : 01राष्ट्रवादी (अप) : 05अपक्ष : 04

नगर पंचायत – मालेगावनगराध्यक्ष : शिवसेना (शिंदे गट)एकूण नगरसेवक : 17भाजप : 03काँग्रेस : 06शिवसेना (शिंदे गट) : 08अपक्ष : —

नगर परिषद नाव - कारंजा

नगराध्यक्ष विजयी -एम आय एम (इतर)

नगरसेवक एकूण  -31 - भाजपा - 13 काँग्रेस -1, राष्ट्रवादी अप -1,एम आय एम -16

वाशिम मतमोजणी सुरूवाशिम नगरपालिका एकूण जागा 32

 नगरअध्यक्ष पदाचे भाजप उमेदवार अनिल केंदळे आघाडीवर

भाजप -11शिवसेना उभाठा : 08काँग्रेस 01राष्ट्रवादी काँग्रेस (अप) :00 राष्ट्रवादी काँग्रेस (शप):-00शिंदे शिवसेना: 00

तेल्हारा नगरपालिका

सत्ता राखली : भाजप नगराध्यक्ष विजयी उमेदवार : वैशाली पालीवाल मताधिक्य : 1242

एकूण जागा :  20 घोषित : 20

पक्षीय बलाबल : 

भाजप : 13 उबाठा : 01वंचित : 02अपक्ष : 02शेतकरी आघाडी : 02