सातारा: साताऱ्याच्या फलटण तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील विरोध सर्वश्रूत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता फलटण नगरपालिकेच्या (Satara Nagarpalika Election) निवडणुकीत हे दोन्ही नेते एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह हे भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिले होते. तर त्यांच्या विरोधात माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेतराजे शिंदेसेनेकडून नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उभे होते. या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं, आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, फलटण नगरपरिषदेमध्ये कमळ फुलले आहे. फलटणमध्ये रामराजेंच्या सत्तेला धक्का बसला आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला आहे. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर विजयी झाले आहे. (Satara Nagarpalika Election)

Continues below advertisement

Satara Nagarpalika Election: वाई, सातारा 

वाई नगराध्यक्ष पदाचे भाजप उमेदवार अनिल सावंत विजयी झाले आहेत. रहिमतपूर नगरपालिका नगराध्यक्ष भाजप वैशाली निलेश माने विजयी झाल्या आहेत. सातारा मलकापूर नगरपालिकामधील भाजप नगराध्यक्ष उमेदवार तेजस सोनवले विजयी झाले आहेत. मेढा नगरपंचायत भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रूपाली वरखडे विजयी झाल्या आहेत.

Satara Nagarpalika Election: पाचगणी, सातारा

पाचगणी नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादी (अजित पवार पुरस्कृत ) उमेदवार दिलिप बगाडे दोन मतानी विजयी झाले आहेत.फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकृत निकाल राखून ठेवला आहे. महाबळेश्वर राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष सुनील शिंदे मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. महाबळेश्वर नगरपालिकेचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील शिंदे 1451 मतांनी विजयी झाले आहेत.

Continues below advertisement

Satara Nagarpalika Election: साताऱ्यात भाजपचा गुलाल कुठे 

मेढा नगरपंचायत भाजप उमेदवार विजयी रहिमतपूर नगरपरिषद भाजप उमेदवार विजयीम्हसवड नगरपरिषद भाजप विजयी वाई नगरपरिषद भाजप विजयी.. मलकापूर नगरपरिषद भाजप विजयी..

साताऱ्यात दोन्ही राजेंना धक्का बसला आहे. तीन अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. असून एक अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. साताऱ्यात अपक्ष उमेदवारानं विजय मिळवलाय. प्रभाग क्रमांक ३ मध्ये मयूर कांबळे आणि जयश्री जाधव यांचा विजय झालाय. तर प्रभाक एक मध्ये भाजप खासदार उदयनराजे भोसले आणि राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंना धक्का देत अपक्ष उमेदवारानं विजयाचा गुलाल उधळलाय. प्रभाग एक मधून अपक्ष उमेदवार शंकर किर्दत विजयी झाले आहेत.