Weekly Horoscope 22 To 28 December 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा फार महत्त्वाचा असणार आहे. कारण, या आठवड्याच्या दरम्यान अनेक छोटे-मोठे ग्रहदेखील नक्षत्र तसेच, राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे डिसेंबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ आणि वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

Continues below advertisement

तूळ रास साप्ताहिक राशीभविष्य (Libra Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा लाभदायक असणार आहे. या आठवड्यात तुमच्या प्रेमाची कबुली देण्याची एक सुवर्णसंधी तुम्हाला मिळणार आहे. तसेच, तुमच्या पार्टनरबरोबर तुम्ही सोशल एक्टिव्हिटीमध्ये सहभागी होणं तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. लवकरच शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. 

करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची तुम्हाला संधी मिळेल. तसेच, तुमचा मानसिक ताण कमी करण्यासाठी तुमच्या कामाची छोट्या छोट्या भागांत विभागणी करा. तुमच्या टीमबरोबर व्यवहार करताना सामंजस्याने व्यवहार करा. या आठवड्यात कोणतीच जोखीम हाती घेऊ नका. तसेच, महत्त्वाचे निर्णय घेताना काळजी घ्या. 

Continues below advertisement

आर्थिक स्थिती (Wealth) - तूळ राशीच्या लोकांनी आपल्या खर्चावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तसेच, तुमच्या खिशाला कात्री लागेल अशी कोणतीच मोठी खरेदी करु नका. तुमचा आर्थिक खर्च कमी कसा करता येईल यावर जास्त लक्ष केंद्रित करा. गुंतवणूक करण्याचा विचार करा.

आरोग्य (Health) - नवीन आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. तसेच, तणावाला कमी करण्यासाठी पुरेशी झोप घ्या. सतत पाणी पित राहा. तसेच, कामाच्या दरम्यान थोडा वेळ ब्रेक घेत राहा. सांधेदुखीचा त्रास होत असल्यास वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.

वृश्चिक रास साप्ताहिक राशीभविष्य (Scorpio Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - वृश्चिक राशीच्या लोकांची लव्ह लाईफ अधिक बहरत जाणार आहे. या कालावधीत तुमचा तुमच्या पार्टनरप्रती विश्वास आणखी वाढेल. तसेच, महत्वाच्या कामांमध्ये पार्टनरचं योगदान मिळेल. 

करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत तुम्ही फोकस्ड असणं गरजेचं आहे. महत्त्वाची कामे आधी पूर्ण करुन घ्या. या आठवड्यात एखादी नवीन स्किल्स शिकण्याचा प्रयत्न करा. याचा भविष्यात तुम्हाला अधिक जास्त वापर करता येईल. 

आर्थिक स्थिती (Wealth) - डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तुमचा खिसा खाली होऊ शकतो. अशा वेळी तुम्हाला आर्थिक तंगीचाही सामना करावा लागू शकतो. अशा वेळी पैसे कसे जपता येतील हा विचार करा. छोटे प्रोजेक्ट हाती घेताना तुमच्या स्किल्सचा विचार करा. 

आरोग्य (Health) - नवीन आठवड्यात हेल्दी रुटीनबरोबरच तुमच्या शरीर आणि मेंदूची योग्य काळजी घ्या. दिवसाच्या सुरुवातीला योग, व्यायाम करणं तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. यामुळे तुम्हाला दिवसभर थकवा जाणवणार नाही.   

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा :       

Weekly Lucky Zodiac Signs : डिसेंबरचा शेवटच्या आठवड्यात 'या' 5 राशींचं नशीब फळफळणार; शुभ योगांसह संपत्तीत होणार भरभराट, वाचा साप्ताहिक राशीभविष्य