Mumbai District Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकांच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात चांगलीच चुरस रंगल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील अभूतपूर्व सत्तासंघर्षानंतर यंदाची विधानसभा निवडणूक राज्यातील पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. अशातच सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे, मुंबई कुणाची? (Mumbai Vidhan Sabha Elecltion 2024) कारण विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच मुंबई महानगरपालिका निवडणुका लागण्याची शक्यता असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं यंदाच्या विधानसभेत जास्तीत जास्त जागा पटकावण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करणार आहे. अशातच यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मुंबईवर ठाकरेंचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. त्यामुळे आता विधानसभेत ठाकरे आपलं अस्तित्व टिकवणार की, शिंदे ठाकरेंवर मात करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

राज्यातील विधानसभा निवडणुकीत 288 जागांसाठी एकूण 4140 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. मुंबई जिल्ह्यात एकूण 36 मतदारसंघ येतात. त्यापैकी 10 मुंबई शहरात आणि उर्वरित 26 मतदारसंघ मुंबई उपनगरात येतात. मुंबईतील लढती या आगामी राजकारणाच्यादृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. जो पक्ष मुंबईत बाजी मारतो, त्या पक्षाचा आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वरचष्मा राहतील, अशा चर्चा सुरू आहेत. यादृष्टीनं मुंबई शहरातील 10 मतदारसंघाचा निकाल हा महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण मानला जात आहे. 

पाहुयात, मुंबई शहरातील कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाकडून कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरलं आहे...? 

विधानसभा मतदारसंघ मविआचे उमेदवार महायुतीचे उमेदवार इतर पक्षांचे उमेदवार 
कुलाबा विधानसभा हिरा नवाजी देवासी (काँग्रेस) राहुल नार्वेकर (भाजप) अर्जुन गणपत रुखे (बहुजन समाज पार्टी)
मलबार हिल विधानसभा भेरुलाल दयालाल चौधरी (ठाकरे गट) मंगल प्रभात लोढा (भाजप)  
मुंबादेवी विधानसभा अमीन पटेल (काँग्रेस) शायना मनिष चुडासमा मुनोत (शिवसेना)  
भायखळा विधानसभा मनोज जामसुतकर (ठाकरे गट) यामिनी यशवंत जाधव (शिवसेना) फैयाज अहमद रफीक अहमद खान  (एआयएमआयएम)
शिवडी विधानसभा अजय चौधरी (ठाकरे गट)   बाळा नांदगावकर (मनसे)
वरळी विधानसभा आदित्य ठाकरे (ठाकरे गट) मिलिंद देवरा (शिवसेना) संदीप देशपांडे (मनसे)
माहीम विधानसभा महेश सावंत (ठाकरे गट) सदा सरवणकर (शिवसेना) अमित राज ठाकरे (मनसे)
वडाळा विधानसभा श्रद्धा जाधव (ठाकरे गट) कालिदास कोळंबकर (भाजप) स्नेहल सुधीर जाधव (मनसे)
सायन-कोळीवाडा विधानसभा गणेश कुमार यादव  (काँग्रेस)

कॅप्टन आर तमिल सेल्वन (भाजप)

संजय प्रभाकर भोगले (मनसे)
धारावी विधानसभा डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड (काँग्रेस) राजेश शिवदास खंदारे (शिवसेना)

मनोहर केदारी रायबागे

(बहुजन समाज पार्टी)