shrikant shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वा खालील सरकारला 9 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्त 30 जून, 2023 पर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वात देशभर लोकसभा मतदारसंघांमध्ये 'विशेष जनसंपर्क अभियान' राबविण्यात येत आहे. भिवंडी लोकसभा क्षेत्रात राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवी यांच्या एकदिवसीय भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भिवंडी शहरात येताना सी टी रवी तसेच स्थानिक खासदार केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, अभियान प्रदेश सहसंयोजक कृपाशंकर सिंग, आमदार महेश चौघुले, भाजपा शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या उपस्थितीत भिवंडी शहरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर सुरू राहणाऱ्या या कार्यक्रमात विविध जाती समुदायाच्या प्रमुखांना ते भेटी देवून लाभार्थीसह चर्चा करणार आहेत.


कल्याण लोकसभा मतदार संघात शिंदे गटाचे खासदार  तथा मुख्यमंत्र्यांच्या पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या जागेवर भाजपने दावा करून उमेदवार उभा करण्याची तयारी गेल्या वर्षभरापासून केली आहे. यामुळे  कल्याण लोकसभेवरून स्थानिक भाजप शिंदे गटात खदखद होऊन भाजपने ठराव करत शिवसेना (शिंदे गटाला ) मदत करणर नसल्याची भूमिका घेतली. यावरून खासदार श्रीकांत शिंदे यांनी राजीनामा देण्याचे सांगत भाजप शिवसेना युतीत कोण मिठाचा खडा टाकतो, असे बोलून युतीत राजकीय तणाव निर्माण केला. मात्र यावर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस टी.  सी.  रवी यांनी शिंदे भाजप युती असून खासदार शिंदेंना राजीनामा देण्याची गरज नसल्याचे सांगून युतीत सर्वच अलबेल असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे कल्याण लोकसभेवरून स्थानिक भाजप शिंदे गटात खदखद निर्माण झाली आहे.  मात्र भाजपचे राष्ट्रीय नेते युतीत सर्वच अलबेल असल्याचे भासवून यावर अधिक बोलणं टाळत असल्याचे दिसून येत आहे. 


गेल्या वर्षभरा पासून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे कल्याण लोकसभा मतदार संघात चार वेळा येऊन स्थानिक भाजप   पदाधिकाऱ्यांच्या   बैठका घेऊन लोकसभा निवडणुकीचे वातावरण निमार्ण केले. त्यामुळे कल्याण लोकसभेवरून भाजप शिंदे गटात दुरी निर्माण झाली. त्यातच डोंबिवली पूर्व भाजपचे अध्यक्ष नंदू जोशी यांनी एका महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा शिंदे गटाच्या नेत्यांमुळे दाखल केल्याचा समज भाजपच्या स्थानिक नेत्यांनी करत , मानपाडा पोलीस ठाण्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या बदलीच्या मागणीसाठी  भाजपने मोर्चा काढला होता.  मात्र मानपाडाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे शिंदे यांचे नजीकचे  असल्याने त्यांची बदली अद्यापही झाली नाही. त्यामुळे भाजप शिंदे गटात आणखीच राजकीय तणाव निर्माण झाला.