नवी दिल्ली :  लोकसभेच्या निवडणुकीची सेमीफायनल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ५ राज्यांच्या निवडणुकीच्या निकालात भाजपला चांगलाच हादरा बसला आहे. भाजपच्या हातून त्यांची सत्ता असणारी महत्वाची राज्ये निसटण्याची शक्यता आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडसह अन्य राज्यात झालेल्या झालेल्या पिछाडीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलणे टाळले आहे.


आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यावेळी धक्कादायक निकाल हाती आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या निकालांवर बोलणं स्पष्टपणे टाळलं. यावरुन भाजपामध्ये चिंतेचं वातावरण असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे कल हाती येऊ लागल्यानंतर भाजपाला खूप मोठा धक्का बसणारे निकाल हाती आले आहेत. यामुळे शक्यता असून काँग्रेसला संजीवनी मिळण्याची शक्यता आहे. या निकालाबाबत मोदींना विचारले असता त्यांनी यावर भाष्य करणे टाळले.

अधिवेशनात जास्तीत जास्त लोकहिताची कामे करु. सर्व सदस्य या भावनेचा आदर करत पुढे जातील अशी अपेक्षा आहे. सरकार जनहितार्थ अनेक विधेयकं आणणार असून यावर चर्चा व्हावी. वाद, विवाद होत असले तरी संवाद झालाच पाहिजे असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.