MP Assembly Election 2023 : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत (MP Election 2023) उमेदवारांचं भवितव्य 17 नोव्हेंबर रोजी मतपेटीत बंद झालेय. 3 डिसेंबर रोजी कुणाचं सरकार येणार (MP Election 2023 Result) ये स्पष्ट होणार आहे. नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्येही या निवडणुकीबद्दल (Election 2023) उत्कंठा लागली आहे. प्रत्येकजण आपापल्या परिने कोण जिंकणार याचे भाकित करत आहे. मध्य प्रदेशमध्ये कोण जिंकणार ? याबाबत दोन व्यक्तींमध्ये एक लाख रुपयांची पैज लागली आहे. त्यासाठी बाँड पेपरवर करार करण्यात आलाय. जिंकणाऱ्याला एक लाख रुपये मिळणार आहेत. या बाँड पेपरचा (stamp paper) फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 


मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस की भाजप,  कुणाचं सरकार येणार यावरुन दोन जणांमध्ये एक लाख रुपयांची पैज लागली आहे. त्यासाठी 50 रुपयांच्या बाँड पेपरवर करारही करण्यात आलाय. त्याशिवाय दोघांनी एक एक लाख रुपयांचा चेकही जमा केलाय. मध्य प्रदेशमधील सूखापूरा येथील दोन व्यक्तींनी ही शर्यत लावली आहे. 


22 नोव्हेंबर 2023 रोजी धनीराम भलावी (माजी सरपंच, सूखापूरा पडरभटा) आणि नीरज मालवीय यांच्यामध्ये एक लाख रुपयांची शर्यत लागली आहे. धनीराम भलावी यांच्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार येणार तर नीरज मालवीय यांच्या मते मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार येणार.. यावरुन या दोन जणांमध्ये एक लाख रुपयांची शर्यत लागली. त्यासाठी त्यांनी 50 रुपयांच्या बाँड पेपरवर साक्षीदाराच्या समोर सर्व लिहून दिलेय. धनीराम भलावी आणि नीरज मालवीय यांनी आपला एक लाख रुपयांचा चेक अमित पांडे यांच्याकडे जमा केलाय. जो शर्यत जिंकेल, त्याला हा चेक मिळणार आहे. 




मध्य प्रदेशच्या कमलनाथ यांच्या जय-पराजयावर 10 लाख रुपयांची पैज 
 
मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांच्या जय पराजयावर दहा लाख रुपयांची पैज लागली आहे. छिंदवाडा येथे दोन व्यक्तीमध्ये शर्यत लागली आहे. छिंदवाडा शहरातील लालबागमधील राहणारे प्रकाश साहू आणि राम मोहन साहू यांनी काँग्रेसचे कमलनाथ आणि भाजपचे बंटी साहू यांच्या जय-पराजयवर पैज लावली आहे. दहा लाख रुपयांची पैज लावल्याचे अॅग्रीमेंटही केलेय. कमलनाथ यांचा पराभव झाला तर प्रकाश साहू हे राम मोहन साहू यांना 10 लाख रुपये देणार आहेत. तर भाजप उमेदवार बंटू साहूचा पराभव झाला तर राम मोहन साहू हे प्रकाश साहू यांना दहा लाख रुपये देणार आहे. यासाठी तीन साक्षीदारांनीही सह्या केल्यात. या करारनाम्याचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.