ईव्हीएम विरोधी आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे देशातील विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज कोलकात्यामध्ये राज यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. कोलकाता राज्याच्या सचिवालयात त्यांची भेट झाली. ईव्हीएमविरोधातील आंदोलनात सहभागी होण्याचं निमंत्रणही त्यांनी ममता यांना दिलं. या भेटीमध्ये ईव्हीएम विरोधातील आंदोलन तसेच निवडणुकीमध्ये ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरचा वापर याबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी 'ईव्हीएमबाबत हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाकडून कोणतीही आशा नाही', अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. तर येत्या 2 तारखेला राज ठाकरे त्यांची पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचीही माहिती आहे.
काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरचा वापर करण्यात यावा, अशी मागणी राज ठाकरेंनी केली होती.