कोल्हापूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली. राज ठाकरे सकाळी 9 वाजता कसबा बावड्यातील सतेज पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली
राज ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर राज यांनी सर्वात आधी अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत पक्षातील इतर नेते तसंच शहरातील पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर ते सतेज पाटील यांच्या भेटीसाठी रवाना झाले.
आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांच्या लग्नसमारंभाला राज ठाकरे उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे कोल्हापूर दौऱ्यात राज ठाकरेंनी सतेज पाटील यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंनी सतेज पाटलांच्या घरी सहकाऱ्यांसोबत नाश्ता केला आणि सुमारे अर्धा तास चर्चा केली.
सतेज पाटील यांच्या आई शांतादेवी पाटील, तसंच प्रतिमा पाटील यावेळी उपस्थित होत्या. राज ठाकरे यांची भेटी राजकीय नसून कौटुंबिक असल्याचं सतेज पाटील यांनी सांगितलं.