मुंबई : रविवारची सुट्टी आणि मुंबई लोकलवरील मेगा ब्लॉकची मुंबईकरांना आता सवय झाली आहे. आजही (रविवार, 24 फेब्रुवारी)मुंबईकरांची ब्लॉकच्या त्रासापासून सुटका नाही. आज मध्य रेल्वेने मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर ब्लॉक घेतला आहे.
आज सकाळी 10.57 ते दुपारी 3.52 दरम्यान मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक काळात डाऊन धिम्या मार्गावरील लोकल फेऱ्या डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर स्थानकांवर लोकल उपलब्ध नसतील. रविवारी जलद लोकल्सना अतिरिक्त थांबे देण्यात येणार आहेत. परिणामी अप आणि डाऊन लोकल सुमारे 15 ते 20 मिनिटे उशीराने धावतील.
मध्य रेल्वेवर पूल दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 9 ते दुपारी 2 दरम्यान कर्जत-खोपोलीदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर ब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉक काळात कर्जत-खोपोली मार्गावरील 3 अप आणि 3 डाऊन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
दरम्यान मध्य रेल्वेने सकाळी 9.56 ते दुपारी 4.16 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेतला आहे. या वेळेत सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे-सीएसएमटी मार्गावरील लोकल फेऱ्या पूर्णपणे बंद राहतील. ब्लॉक काळात कुर्ला स्थानकावरील फलाट क्रमांक 8 वरून पनवेलसाठी विशेष लोकल फेऱ्या चालवल्या जातील.
आज मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Feb 2019 07:37 AM (IST)
रविवारची सुट्टी आणि मुंबई लोकलवरील मेगा ब्लॉकची मुंबईकरांना आता सवय झाली आहे. आजही (रविवार, 24 फेब्रुवारी)मुंबईकरांची ब्लॉकच्या त्रासापासून सुटका नाही.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -