जालना: मनोज जरांगे यांनी आतापर्यंत राज्यातील 25 मतदारसंघात मराठा उमेदवार उभे करायचे निश्चित केले आहे. सोमवारी मनोज जरांगे यांच्याकडून या 25 मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केली जातील. उर्वरित मतदारसंघांमध्ये मराठा आरक्षण (Maratha Reservation) विरोधी उमेदवारांना पाडण्याची रणनीती जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी आखली आहे. महाराष्ट्रातील ज्या मतदारसंघात आम्हाला आमच्या ताकदीवर लढायचे आहे, त्या मतदारसंघांबाबत आम्ही चर्चा करत आहोत. राज्यात पहिल्यांदा उमेदवारांना प्रत्यक्ष बोलून मतदारसंघ विचारले असतील. SC ST जागेवर उमेदवार देणार नसल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले.


जिथे उभे करायचे नाही तिथे आपल्या विचाराच्या उमेदवाराला बॉण्ड आणि व्हिडिओ घेऊन त्याला पाठिंबा देणार (तो व्हायरल करणार नाही). दलित मुस्लिम मदतीला आहे तरीही आमची शक्ती जिथे आहे तिथेच लढणार आहोत. एका जिल्ह्यात एक किंवा दोन लढणार आणि बाकीच्या पाडणार, असे जरांगे यांनी म्हटले. 25 मतदारसंघावर चर्चा झाली 11 मतदारसंघ पेंडिंग आहेत. आमच्या गोरगरीब मुलांना. त्रास द्यायचा प्रयत्न करू नका. मुस्लिम, दलित मिळून 20 -25 जागांचा आकडा जाहीर  होईल. आम्हाला राजकारण हवस म्हणून करायचे नाही, कोणीही बळच हट्ट करू नका. सत्ताधाऱ्यांना मी सोडणार नाही, समाजाला संपवणाऱ्याना मी संपवणार, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.


मनोज जरांगेंचा एमएमडी फॉर्म्युला


मनोज जरांगे यांनी मराठा, मुस्लीम आणि दलित समाज असे MMD समीकरण तयार केले आहे. त्यानुसार मराठा समाज, मुस्लीम समाज आणि दलित समाजाची ताकद असलेल्या मतदारसंघात उमेदवार दिले जाणार आहेत. त्यामुळे आज मनोज जरांगे आणखी किती मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा करणार आणि तेथील उमेदवार कोण असतील, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


मनोज जरांगे कोणत्या मतदारसंघातून मराठा उमेदवार उभे करणार?


बीड मतदारसंघ
केज(बीड)
मंठा 
परतुर (जालना)
फुलंब्री
हिंगोली (पेंडिंग)
वसमत (पेंडिंग)
पाथरी (परभणी) मतदारसंघ लढवायचा
हादगाव (पेंडिंग)
कळंब धाराशिव 
दौंड 
पर्वती 
कोपरगाव
गंगाखेड (पेंडिगं)
लोहा कंधार (पेंडिगं)
पाचोरा (पेंडिंग)
पाथर्डी 
धुळे (पेंडिंग)
धाराशिव कळंब मतदारसंघ लढवायचा 
भूम परंडा लढवायच 
दौंड आणि पर्वती लढवायचा 
पाथर्डी मतदारसंघ लढवायचा
शेवगाव मतदारसंघ लढवायचा
 कोपर्डा मतदारसंघ लढवायचा
करमाळा लढवायचा 
माढा (पेंडिगं)
निफाड आणि नांदगाव (पेंडिग)


आणखी वाचा


मनोज जरांगे सांगतील तोच उमेदवार,  इतर उमेदवार अर्ज मागे घेणार, इच्छुक उमेदवारांनी दिले शपथपत्र


विधानसभेच्या निकालानंतर काय होईल सांगता येत नाही, शरद पवार-एकनाथ शिंदेचं काहीतरी चाललंय; नवाब मलिकांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण


राज ठाकरे महायुतीचा खेळ बिघडवणार?; मुंबईतील 25 मतदारसंघ ठरणार गेमचेंजर