Milind Soman Birthday: फिटनेसच्या बाबतीत कायमच चर्चेत असणारा मिलिंद सोमण बॉलिवूड, टेलिव्हिजन आणि मॉडेलिंग या तिन्ही विश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे. मिलिंदने त्याच्यापेक्षा 26 वर्षांनी लहान असलेल्या अंकिता कोंवरसोबत लग्न करून चर्चेत आला होता. 4 नोव्हेंबर 1965 रोजी जन्मलेले मिलिंद सोमण आज त्यांचा 59 वा वाढदिवस साजरा करत आहे. मिलिंद त्याच्या बोल्ड अंदाजामुळे आणि विशेष म्हणजे अर्ध्या वयाच्या मुलीच्या प्रेमात पडल्यामुळे कायमच चर्चेत असतो. मिलिंदची लव्हस्टोरी सगळीकडे इतकी वेगाने पसरली की तेंव्हापासून बॉलिवूडच्या विश्वात ही बातमी उघड झाल्यापासून ही एक ट्रेंडिंग लव्हस्टोरी आहे. ते सर्वात जास्त चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक आहेत ते त्यांच्या वयातील 26 वर्षांच्या प्रचंड फरकामुळे.
कशी सुरू झाली मिलिंद सोमणची lovestory?
मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर यांची पहिली भेट एका नाईट क्लबमध्ये झाली होती . भेट झाल्यावर दोघेही एकमेकांकडे दुर्लक्ष करू शकले नाहीत. वारंवार एकमेकांसमोर येत राहिल्याने अंकिताने हिंमत एकवटून मिलिंदला डान्ससाठी विचारले आणि त्यानेही हो म्हटले. यानंतर दोघांनी डान्स केला आणि अंकिताने मिलिंदचा नंबर मागितला. दोघेही काही दिवस फोनवर बोलले आणि चांगले मित्र बनले.
अंकितावर दुःखाचा डोंगर कोसळला
मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर यांची मैत्री दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालली होती. पण त्याच दरम्यान अंकितावर दुःखाचा डोंगर कोसळला . अंकिताच्या प्रियकराचा मृत्यू झाल्यामुळे ती पूर्णपणे कोसळली. या वेदनांवर मात करण्यासाठी मिलिंद सोमण यांनी अंकिताला खूप साथ दिली. हळूहळू त्यांच्या भेटीगाठी वाढत गेल्या आणि त्यांची मैत्री घट्ट होऊ लागली.
मिलिंदने प्रेम व्यक्त केले
मिलिंदने हिंमतिने आणि अंकिताकडे आपले प्रेम व्यक्त केले. यानंतर दोघांनी बराच काळ एकमेकांना डेट केले आणि 2018 मध्ये लग्न केले. वयातील फरकामुळे ते लोकांच्या निशाण्यावर आले आणि त्यांना खूप ट्रोल करण्यात आले. लग्नाच्या वेळी मिलिंद 52 आणि अंकिता 26 वर्षांची होती.दोघांनीही मराठी रितीरिवाजानुसार लग्न केले.