Maharashtra Vidhan Sabha Election 2024 मुंबई: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) काऊंटडाऊन सुरू झाले आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे. अशा परिस्थितीत मुंबईतील विधानसभेच्या 36 जागा अत्यंत महत्त्वाच्या आहेत, कारण या 36 जागांपैकी 25 जागांवर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भक्कम पकड आहे.


मनसेने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी 'एकला चलो रे'चा नारा दिला. मनसेचे राज्यात 150 हून अधिक विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. यामध्ये मुंबईतील विधानसभेच्या 36 पैकी 25 जागांवर मनसेने उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे मनसेने उमेदवार उभे केल्याने मुंबईत याचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता आहे. मुंबईत भाजप 17 जागांवर तर शिवसेना 16 जागांवर निवडणूक लढवत आहे. 


मनसेचे शिंदेंच्या विरोधात 12, तर भाजपविरोधात 10 उमेदवार-


राज ठाकरे यांच्या पक्षाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाच्या विरोधात 12 आणि भाजपच्या विरोधात 10 जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तर महायुतीने शिवडी मतदारसंघातून आपला उमेदवार उभा केलेला नाही. शिवडी मतदारसंघातून मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर रिंगणात आहेत. याशिवाय मनसेचे अजित यांच्या गटाच्या विरोधात एक, तर आरपीआयच्या विरोधात एक उमेदवार उभा केला आहे.


मनसेला मराठी मते मिळाल्यास महायुती आणि महाविकास आघाडीला बसणार फटका-


मनसेने मुंबईतील वरळी, माहीम, मागठाणे, कुर्ला, चांदिवली, भांडुप आणि विक्रोळीसह इतर जागांवर उमेदवार उभे केले आहेत. या जागांवर मराठी माणसांची मते राज ठाकरे यांच्या पक्षाला गेली तर महायुती आणि महाविकास आघाडीचे मोठे नुकसान होऊ शकते.


मुंबईतील कोणत्या जागांवर महायुती आणि मनसेमध्ये टक्कर होणार?


कुलाबा-राहुल नार्वेकर (भाजप) - मनसेने उमेदवार दिला नाही.
मलबार हिल- मंगल प्रभात लोढा (भाजप)- मनसेने उमेदवार दिला नाही.
मुंबादेवी - शायना एनसी (शिंदे गट)
भायखळा- यामिनी जाधव (शिंदे गट)
वरळी- मिलिंद देवरा (शिंदे गट) - संदीप देशपांडे (मनसे)
शिवडी - बाळा नांदगावकर (मनसे) महायुतीकडून उमेदवार दिला नाही.
माहीम- सदा सरवणकर (शिंदे गट) - अमित ठाकरे (मनसे)
वडाळा- कालिदास कोळंबकर (भाजप)- स्नेहल जाधव (मनसे)
धारावी- राजेश खंडारे (शिंदे गट)- मनसेने उमेदवार दिला नाही.
कुर्ला- मंगेश कुडाळकर (शिंदे गट)- प्रदीप वाघमारे (मनसे)
वांद्रे पश्चिम- आशिष शेलाक (भाजप)- मनसेने उमेदवार दिला नाही. 
वांद्रे पूर्व- झिशान सिद्दीकी (अजित पवार गट)- तृप्ती सावंत (मनसे)
चांदिवली- दिलीप लांडे (शिंदे गट)- महेंद्र भानुशाली (मनसे)
चेंबुर- तुकाराम काठे (शिंदे गट)- माऊली थोरवे (मनसे)
अणुशक्ती नगर- सना मलिक (अजित पवार गट)- मनसेने उमेदवार दिला नाही. 
विलेपार्ले- पराग अळवणी (भाजप)- जुईली शेंडे (मनसे)
अंधेरी पश्चिम- अमित साटम (भाजप)- मनसेने उमेदवार दिला नाही.
वर्सोवा- भारती लव्हेकर (भाजप)- संदेश देसाई (मनसे)
गोरेगाव- विद्या ठाकूर (भाजप)- विरेंद्र जाधव (मनसे)
कांदिवली पूर्व- अतुल भातखळकर (भाजप)- महेश फारकसे (मनसे)
दिंडोशी- संजय निरुपम (शिंदे गट)- भास्कर परब (मनसे)
जोगेश्वरी पूर्व- मनीषा वायकर (शिंदे गट)-भालचंद्र अंबुरे (मनसे)
चारकोप- योगेश सागर (भाजप)- दिनेश साल्वी (मनसे)
मालाड पश्चिम- विनोद शेलार (भाजप)-मनसेने उमेदवार दिला नाही. 
बोरीवली- संजय उपाध्याय (भाजप)- कुणाल मेनकर (मनसे)
दहिसर- मनीषा चौधरी (भाजप)- राजेश येरुणकर
मुलुंड- मिहीर कोटेचा (भाजप)- मनसेने उमेदवार दिला नाही. 
भांडुप पश्चिम- अशोक पाटील (शिंदे गट)- शिरीष सावंत (मनसे)
विक्रोळी- सुवर्णा करंजे (शिंदे गट)- विश्वजीत दोलम (मनसे)
कलिना- अमरजीत सिंह (आरपीआय-भाजप)-संदीप हुटगी (मनसे)
मानखुर्द शिवाजी नगर- सुरेश पाटील (शिंदे गट)- जगदीश खांडेकर (मनसे)
घाटकोपर पश्चिम- राम कदम (भाजप)- गणेश चुक्कल (मनसे)
घाटकोपर पूर्व- पराग शाह (भाजप)-संदीप कुलथे (मनसे)
अंधेरी पूर्व- मुरजी पटेल (शिंदे गट)- मनसेने उमेदवार दिला नाही. 
मागाठाणे- प्रकाश सुर्वे (शिंदे गट)- नयन कदम (मनसे)
सायन- तमिल सेलवन (भाजप)- मनसेने उमेदवार दिला नाही. 


संबंधित बातमी:


'राज'पुत्र अमित ठाकरेंच्या मतदारसंघात नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; महायुतीची जंगी सभा होणार