जालना : मराठा समाजासाठी आंदोलन करणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेचं (vidhansabha) रणशिंग फुंकले असून उमेदवार देणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे, राज्यातील ठराविक मतदारसंघात मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार उभा करण्यात आले आहेत. त्यामुळे, ज्या उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल दाखल केला आहे, त्यांना जरांगे पाटील यांनी महत्वाचं आवाहन केलं आहे. दरम्यान, शुक्रवारी अंतरवाली सराटी येथे मुस्लीम धर्मगुरु सज्जाद नोमानी, स्वत: मराठा आदोलक मनोज जरांगे पाटील आणि आनंदराज आंबेडकर एकत्रित आलेले पाहायला मिळाले. तिघांमध्ये अंतरवालीमध्ये बैठक देखील पार पडली. या बैठकीनंतर सर्वांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार देणार असल्याची घोषणा केली होती. 


मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रातील सर्व जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या आणि उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या मराठा बांधवांना महत्वाचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्रात ज्यांनी आमच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केले त्यांनी तातडीने एकत्र बसून बैठक घ्या, या बैठकीत सर्वांनी मिळून एक उमेदवार ठरवा असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे. आपल्यासाठी ही चांगली संधी आलेली आहे, ओढातानीच्या नादात ही संधी घालू नका, असेही जरांगे पाटील यांनी म्हटले. त्यामुळे, आता मनोज जरांगे विधानसभेच्या रणांगणात उतरले असल्याचे स्पष्ट झालं आहे.


कालपासून मराठ्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. काल मराठा दलित मुस्लिम हे समीकरण एकत्र आल आहे. आम्हाला तीन तारखेला मतदार संघ आणि उमेदवार जाहीर करायचे आहेत, अशी माहिती देखील जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्यामुळेच, आज किंवा उद्या एकत्र बसून मतदारसंघातील बांधवांनी एकच उमेदवार जाहीर करा, असे आवाहन अर्ज भरलेल्या उमेदवारांना मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.


मनोज जरांगे हे आधुनिक गांधी


मला भारताच्या संविधानासारखं दुसरं कोणतं संविधान नाही. संविधानातील प्रत्येक शब्दावर चर्चा होत होती. ती चर्चा त्यांच्या मुलाबाळांसाठी नाही. शेतकरी, मजूर आणि कष्टकऱ्यासांठी करत होते. भारतातील शोषित समाजाच्या चर्चा पार पडत होती. महाराष्ट्राने यामध्ये लिडिंग रोल घेतला होता. ही बाब महाराष्ट्रातील लोकांना समजली पाहिजे. महापुरुष महाराष्ट्रात जन्माला आले होते. मी उत्तरप्रदेशचा आहे. मात्र, मनोज जरांगे मला मराठी शिकवतील आणि मी जरांगेंना हिंदी शिकवेन, अशी आमच्यामध्ये ठरलं आहे. संपूर्ण देशात जरांगेंची गरज आहे. त्यामुळे हिंदी शिकणे गरजेचे आहे. मी प्रत्येक ठिकाणी त्यांच्या बोलण्याचा अनुवाद करेन. मनोज जरागेंच्या रुपाने भारताला आधुनिक गांधी-आंबेडकर आणि कलाम मिळणार आहे. 


हेही वाचा


सोलापुरातील 11 मतदारसंघातील लढती ठरल्या, कोण कोणशी भिडणार, महायुती व मविआच्या उमेदवारांची यादी