मुंबई : दिवाळीतील बहीण-भावाच्या नात्याचा गोडवा जपणारा आणि भावनिक बंध अधिक घट्ट करणारा सण म्हणजे भाऊबीज. देशभरात आज लाडक्या बहिणींसाठीचा भाऊबीज सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनीही आज त्यांच्या मोठ्या बहिणीकडे भाऊबीज साजरी केली. परभणीच्या गंगाखेडमधील उर्मिला केंद्रे या धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्या मोठ्या भगिनी आहेत, आज त्यांच्या घरी येत धनंजय मुंडेंनी आज भाऊबीज साजरी केली, मी सर्वात लहान असल्याने माझ्यासाठी सर्वच बहिणींचा आशीर्वाद हा महत्त्वाचा असतो, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले. तसेच या निवडणुकीमध्ये महिला तरुणी शेतकरी सामान्य वर्ग हे सर्वच सरकारचे लाडके घटक झाले आहेत. त्यामुळे या निवडणुकीतील (Election) हेच घटक गेम चेंजर ठरणार असल्याचे भाकीत देखील धनंजय मुंडे यांनी केलंय.


गंगाखेडमध्ये भाऊबीज, निवडणूक ते मनोज जरांगे पाटील या विषयांवर धनंजय मुंडेंनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी, जरांगे पाटील यांच्या भूमिकेवरही त्यांनी भाष्य केलंय. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील काही ठराविक मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले. त्यात, बीड जिल्ह्यातील 2 मतदारसंघात उमेदवार देण्याबाबत त्यांनी स्पष्ट केलं. तर, उर्वरित 4 मतदारसंघात उमेदवार देणे किंवा पाडणे याबाबत लवकरच ते निर्णय घेणार आहेत. विशेष म्हणजे, सगळ्यांचे लक्ष लागलेल्या परळी मतदारसंघाबाबत मनोज जरांगे यांनी निर्णय अद्याप राखून ठेवला आहे. उमेदवार देण्याच्या किंवा पाडण्याच्या यादीत परळी मतदारसंघाचं नाव नाही. त्यातच, मनोज जरांगेंच्या भूमिकेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.  


सगे-सोयरेचा विषय संसदेतच पूर्ण होऊ शकतो


मनोज जरांगे पाटलांनी त्यांची भूमिका अगोदर ठरवली होती, त्यामुळे त्याच्यावर फार काही बोलणार नाह. त्यांच्या बऱ्याचशा मागण्या मान्य झाल्या आहेत. मात्र सगे सोयरेच्या मागणी संदर्भामध्ये देशाच्या संविधानात आणि संसदेमध्ये हा विषय पूर्ण होऊ शकतो, त्याला वेळ लागणार असल्याचे मुंडे यांनी म्हटले. 


आव्हाड यांच्या वक्तव्यावर पलटवार


जितेंद्र आव्हाड यांनी जे वक्तव्य केलं त्याचा समाचारही धनंजय मुंडे यांनी घेतला. जितेंद्र आव्हाड ज्या पद्धतीने बोललेत आम्हीही आमचे त्या काळचे आधारस्तंभ यांच्याबद्दल असेच बोलायचं का असं धनंजय मुंडे यांनी शरद पवारांचे नाव न घेता म्हटले.


हेही वाचा


Manoj jarange: त्रास दिला त्याला पाडून बदला घ्यायचा; मनोज जरांगेंचा बीडमधून पहिला उमेदवार रिंगणात