Uttam Jankar : माझ्या मतदारसंघाच्या विकासाच्या आड कोणी आल्यास त्याच्या छताडावर बसून निधी आणणार असल्याचा इशारा माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे (Malshiras Assembly Constituency) शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर (MLA Uttam Jankar) यांनी दिला आहे. राज्यात पुन्हा महायुती सत्तेत आली ती केवळ लाडक्या बहिणींमुळे अशी कबुली देखील उत्तम जानकर यांनी दिली. लाडक्या बहिणींचा अंडर करंट समजू शकला नाही, त्यामुळेच भाजपाला यश मिळाल्याचे जानकर म्हणाले. 


राष्ट्रवादी शरद पवार गटाचे फायर ब्रँड तोफ म्हणून ओळख असलेले उत्तम जानकर माळशिरस विधानसभा मतदारसंघातून अतिशय थोडक्यात मताधिक्याने शेवटच्या फेऱ्यात विजयी झाले. राज्यात पुन्हा महायुती सत्तेत आली ती केवळ लाडक्या बहिणींमुळे अशी कबुलीही उत्तम जानकर यांनी दिली आहे. मात्र, माझ्या मतदारसंघात विकासाच्या आड कोणी आल्यास छाताडावर बसून निधी आणणार असा इशाराही उत्तम जानकर यांनी महायुतीच्या नेत्यांना दिला आहे. उत्तम जानकर हे सातत्याने अजित पवार यांच्यावर टोकाची टीका करताना दिसले होते. आता पुन्हा एकदा राज्याच्या तिजोरीच्या चाव्या अजितदादांकडे जाण्याची शक्यता असताना जानकरांना निधी मिळणार का? हा प्रश्न सर्वांना पडला होता. त्यासाठीच त्यांनी थेट इशारा देत छाताडावर बसून निधी मिळवणा असल्याचे सांगितले. त्यामुळं पुन्हा एकदा अजित पवार व उत्तम जानकर यांच्यातील सभातून सुरू असलेला संघर्ष आता विधानसभेत पाहायला मिळणार आहे. 


माळशिरस मतदारसंघात जास्तीत जास्त निधी आणून विकास करण्यावर भर देणार


एका बाजूला मोहिते पाटील आणि दुसऱ्या बाजूला उत्तम जानकर असे दोन्हीही गट एकत्रित येऊन निवडणूक रिंगणात उतरल्याने येथील विजय हा विक्रमी विजय ठरेल असे दावे दोन्ही गटाकडून करण्यात आले होते. मात्र, भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी ज्या पद्धतीने व्यूहरचना करीत तब्बल 1 लाख 8 हजार मते मिळविल्याने हा मोहिते पाटील व उत्तम जानकर यांना मोठा धक्का आहे. आपला विजय पक्का समजून उत्तम जानकर यांनी राज्यातील अनेक मतदारसंघात प्रचार करत राष्ट्रवादीसाठी स्टार प्रचारक म्हणून काम केले होते. अगदी सोलापूर जिल्ह्यात शरद पवार गटाला मिळालेल्या चारही जागांवरही उत्तम जानकर यांनी जोरदार प्रचार केला होता. मात्र त्यांच्या जागेवर त्यांना कसाबसा 13000 शेवटच्या टप्प्यात विजय मिळवता आल्याने ही लाट केवळ लाडक्या बहिणींची आहे अशा शब्दात त्यांनी महाविकास आघाडीचा पराभव मान्य केला. मात्र कसेही असले तरी माळशिरस या माझ्या मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी आणून विकास करण्यावर माझा भर असणार आहे असे सांगताना त्यात जर कोणी आडवे आले तर छाताडावर बसून निधी आणि असा इशाराही दिला आहे.