Radhika Marchant: मनोरंजनसृष्टीत असो की फॅशन इंडस्ट्रीत एकदा एखाद्या कार्यक्रमात घातलेले कपडे रिपिट केले जात नाहीत हा रुळलेला ट्रेंड आता हळूहळू बदलताना दिसतोय. आता अनेक कलाकारांनी हा पायंडा तोडत आपल्याला आवडणारे कपडे रिपिट करत स्टिरिओटाईप तोडत आहेत. अलिकडेच राधिका मर्चंटने (Radhika Marchant look) तिच्या मैत्रीणीच्या लग्नात हजेरी लावली. आपल्या गॅल्मरस एथनिक लुकनं ती पुन्हा एकदा चर्चेत आली होती. चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे ईशा अंबानीच्या लग्नात घातलेला लेहेंगा तिनं या लग्नात परत घातला होता.पेस्टल गुलाबी झाक असणारा हा लेहेंगा आणि त्यावरील दागिनेही रिपिट करत नववधूंसह फॅशनविश्वातही तिनं एकदा घातलेले कपडे रिपीट करणं स्टाईल असल्याचं दाखवून दिलं.
ईशा अंबानीच्या लग्नातही घातला होता सेम लेहेंगा
अंबानी कुटुंब आपल्या व्यवसायाच्या अपडेट्स जसं देत असतं तसंच आपल्या वैयक्तिक आयुष्यातील क्षणांना समोर आणत असतं. अलिकडेच रााधिकानं शेअर केलेला तिचा लुक चर्चेत आहे. सोशल मीडियावर अंबानी अपडेट्स या पेजवरून राधिकाचे काही फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. यात ईशा अंबानीच्या लग्नात म्हणजे २०१८ साली घातलेला लेहेंगा परत परिधान करून ती एका मैत्रिणीच्या लग्नात गेली होती.पोस्टमध्ये ईशा अंबानीच्या 2018 च्या लग्नातील थ्रोबॅक चित्र देखील आहे, जिथे राधिका अनंत अंबानींसोबत पोज देताना समान पोशाख परिधान करताना दिसत आहे.
लेहेंग्यासह दागिनेही केले रिपिट
राधिकानं घातलेल्या पेस्टल पिंक रंगाच्या लेहेंग्यावर तिनं पांढरा कुंदन चोकर नेकलेस, बोल्ड स्टेटमेंट झुमका कानातले, तिच्या मनगटावर रचलेल्या चांदीच्या बांगड्या, डायमंड पेंडेंट असलेले काळे मंगळसूत्र आणि बोटाला सजवणारी एक मोठी हिऱ्याची अंगठी असा लूक केला होता.
मिनिमल मेकप
राधिका मिनिमल मेकअपमध्ये या लुकमध्ये उठून दिसत होती. यात आयलाइनर, मस्करा,ब्लशचा इशारा, एक चमकणारा हायलाइटर आणि न्यूड लिपस्टिक शेड होते. एथनिक लेहेंगा लुकमध्ये राधिका सुंदर दिसत होती. तिच्या फोटोजवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंटस केल्या आहेत. जुलै 2024 मध्ये अनंत अंबानींशी लग्न केले, त्यांच्या लग्नाचा सोहळा तीन दिवस चालला आणि असंख्य आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी, हॉलीवूड तारे, राजकारणी आणि जागतिक नेते उपस्थित होते. मैत्रिणीच्या लग्नात राधिकानं घातलेल्या लेहेंग्यानं फॅशनप्रेमींचे लक्ष वेधून घेतलं.
हेही वाचा: