Mahim Vidhan Sabha Election 2024 मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये सर्वात रंजक लढत आता माहीम विधानसभा मतदारसंघात होणार आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना उमदेवारी जाहीर केल्यानंतर, उद्धव ठाकरेंची शिवसेना कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर आज पदाधिकाऱ्यांच्या बैठीक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महेश सावंत यांना माहीम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात शिवसेना शिंदेंकडून आमदार सदा सरवणकर यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे आता सदा सरवणकर विरुद्ध अमित ठाकरे विरुद्ध महेश सावंत अशी तिहेरी लढाई दादर माहीम मतदारसंघात होणार आहे.


मनसेची दुसरी यादी काल जाहिर झाली. या यादीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे माहिम विधानसभेतून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेत. पहिल्यांदाच अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत. एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा माहीम विधानसभा मतदारसंघातून ते नशीब आजमावत आहेत. या ठिकाणी त्यांच्या विरोधात शिंदे सेनेच्या सदा सरवणकर आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महेश सावंत असणार आहे.  त्यामुळे या ऐकुणच राजकीय परिस्थितीत माहीम विधानसभा मतदारसंघातील विजयासाठी राजकीय गणित अमित ठाकरे कशी बांधतात, हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र अमित ठाकरेंचा राजकीय कारकीर्द कशी आहे जाणून घेऊ.


ठाकरेंचे दुसरे युवराजही राजकारणात


हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सक्रिय राजकारणाचे केंद्र कायमच राहिले. मात्र निवडणुकीच्या राजकारणापासून ते कायमच लांब राहिले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी यांनीही बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल पाऊल टाकलं, मात्र ठाकरेंची दुसरी पिढीही देखील आता राजकारणात सक्रीय झाली आहे. आदीत्य ठाकरें पाठोपाठ आता अमित ठाकरेही आपलं नशीब आजमवू पहात आहेत. 


अमित ठाकरेंसमोर  शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे सदा सरवणकर यांचे आव्हान असेल. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं महविकास आघाडीतील जागावाटप अद्याप न झाल्याने, या मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला नाहीय. वरळीतून आदित्य ठाकरे 2019 साली लढले होते, त्यावेळेस मनसेने उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे यावेळी माहीममधून अमित ठाकरे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे उमेदवार देतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


दादर माहिममध्ये दिलेल्या उमेदवारीमुळे पंधरावर्षापूर्वी मनसेचा असलेला बालेकिल्ला पून्हा काबीज करण्याची उत्तम संधी अमित ठाकरेंमुळे मनसेला मिळतेय, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरणं आहे. याच उदाहरण द्यायचं झालंचं तर महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंना शिवाजी पार्क हे मैदान सभेसाठी हवे असताना ते मिळालं नव्हतं. त्यावेळी राज ठाकरेंनी असा काही करिष्मा केला की या मतदार संघातील सहाच्या सहा नगरसेवक मनसेचे निवडून आले. आता पून्हा राज ठाकरे अमित ठाकरेंच्या विजयासाठी असाच काहीचा करिष्मा करतील अशी चर्चा आहे.


तिहेरी लढतीत कोणाचे पारडं जड?  


महायुतीच्या जागा वाटपात हा मतदार संघ शिंदेकडे गेला. मात्र लोकसभा निवडणूकीत राज ठाकरेंनी भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहिर केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज ठाकरेंचे असलेले संबध पाहता. भाजपने अमित ठाकरेंना अप्रत्यक्ष पाठींबा दिला. त्याच बरोबर ठाकरेंनी या मतदार संघात उमेदवार दिला. तर मतांची विभागणी होऊन अमित ठाकरेंना त्याचा फायदा होऊ शकतो. त्याच बरोबर मागील विधानसभा निवडणूकीत राज ठाकरेंनी आदीत्य ठाकरे समोर उमेदवार दिला नव्हता. त्याच पद्धतीने उद्धव ठाकरेंनी उमेदवार जर का नाही दिला. तरी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार्या सदा सरवणकर यांना धडा शिकवण्यासाठी अमित ठाकरेंना मत देऊन अमित ठाकरेंचा विजय सुखकर होऊ शकतो.


माहिम हा मतदार संघ दिसतो तितका सोपा नाही. पंधरावर्षानंतर पुलाखालून बरच पाणी वाहून गेलयं, मतदार संघापाठोपाठ मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत. मराठी पाठोपाठ बहुभाषिक मतदारांचीही यात भर पडलेली आहे. या मतदार संघात मुस्लिम बहुलभागही आहे. अशातच राज ठाकरेंनी प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्याने मुस्लिम मतांचा विचार ही अमित ठाकरेंना करावाच लागेल.


कोण आहेत अमित ठाकरे?


अमित ठाकरेंचा जन्म 24 मे 1992 चा आहे. अमित ठाकरेचं शिक्षण बाॅम्बे स्काॅटिजमधून झालं असून आर ए पोतदार काॅलेजमधून पदवीधर शिक्षण पूर्ण केलेलं आहे. 2019 मध्ये अमित ठाकरेंचा विवाह मिताली बोरूडे यांच्याशी झाला. अमित ठाकरे हे उत्कृष्ठ आर्टीस्टही आहेत. पर्यावरणाबाबतही ते जागरूक असून अनेक पर्यावरणाचे कार्यक्रमही हाती घेत असतात. 


हे ही वाचा