Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीत मिळवले एवढेच मतदान महायुतीने लोकसभा निवडणुकीत देखील मिळवले असते. तर महायुती राज्यातील 48 पैकी 47 लोकसभा मतदारसंघात विजयी झाली असती. आणि 48 पैकी फक्त माढा लोकसभा मतदारसंघच महाविकास आघाडीकडे गेला असता. त्यामुळे लोकसभेच्या तुलनेत महायुतीने विधानसभेत महाविजय मिळवले असले, तरी त्यामागे महाविकास आघाडीने लोकसभेच्या तुलनेत 23 लाख 5 हजार 599 मते गमावली आहे. तसेच वाढलेल्या मतदानातून महायुतीने तब्बल 70 लाख 36 हजार 778 मते आपापल्या कडे खेचली आहे. परिणामी महायुती आणि महाविकास आघाडीच्या मतांमध्ये तब्बल 96 लाख 42 हजार पेक्षा जास्त मतांचे मोठे अंतर निर्माण झाले आहे आणि हेच महायुतीच्या महाविजयाचे प्रमुख कारण ठरले आहे.
विधानसभेत मिळवलेल्या मतांएवढे मतं महायुतीने लोकसभा निवडणुकीत मिळवले असते, तर विदर्भातील तर सर्व 10 लोकसभा मतदारसंघात महायुती विजयी झाली असती.
विधानसभा निवडणुकांचे विश्लेषण एका क्लिकवर
लोसभेच्या तुलनेत विधानसभेत महायुतीने किती मोठ्या प्रमाणावर मतं आपल्याकडे खेचले? याची आकडेवारी लक्ष्यात घेतली तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने २,६०,४०६ मतांनी विजय मिळवला होता. मात्र विधानसभेत चंद्रपुर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रात महायुतीने महाविकास आघाडीच्या तुलनेत १,०५,६१९ मते जास्त घेतली आहे. म्हणजेच चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात महायुतीने लोकसभेतील महाविकास आघाडीचे आणि वाढलेल्या मतदानाचे तब्ब्ल ३,६६,०२५ मतं आपल्याकडे खेचले आहे.
लोकसभा निवडणुकीत रामटेक मतदार संघात काँग्रेसचा उमेदवार ७६,७६८ मतांनी विजयी झाला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने रामटेक लोकसभा क्षेत्रातील सहा विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या तुलनेत २,७४,७३५ मतं जास्त घेतली आहे. म्हणजेच रामटेक लोकसभा मतदारसंघात यंदा महायुतीने लोकसभेच्या तुलनेत महाविकास आघाडीचे आणि वाढलेल्या मतदानाचे ३,५१,५०३ मतं आपल्याकडे खेचले आहे.
लोकसभा निवडणुकीत भंडारामध्ये काँग्रेसचा ३७,३८० मतांनी विजयी झाला होता. विधानसभा निवडणुकीत मात्र भंडारा लोकसभा क्षेत्रातील सात विधानसभा क्षेत्रात महायुतीने महाविकास आघाडीचे तुलनेत २,२३,१७३ मतं जास्त घेतली आहे. म्हणजेच भंडारा लोकसभा क्षेत्रात लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत महायुतीने तब्बल २,६०,५५३ मते महाविकास आघाडी आणि वाढलेल्या मतदानातून आपल्याकडे खेचले आहे.
यवतमाळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ९४,४७३ मतांनी विजयी झाले होते. विधानसभा निवडणुकीत यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा क्षेत्र मिळून महायुतीने महाविकास आघाडीच्या तुलनेत १,६५,९२२ मतं जास्त घेतली आहे. म्हणजेच लोकसभेच्या तुलनेत महायुतीने यवतमाळ वाशिम मध्ये महाविकास आघाडीचे आणि वाढलेल्या मतदानाचे २,६०,३९५ मते आपल्या कडे खेचले आहे...
अशाच पद्धतीने अमरावतीत २,५६,००० मतं, वर्ध्यात २,५२,१६२ मतं तर गडचिरोलीत १,९८,०३५ एवढी मतं महायुतीने महाविकास आघाडी कडून आपल्याकडे खेचून घेतली..
हे ही वाचा