संभाजीनगर : राज्यातील सर्वच मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा झाली आहे. त्यानंतर, विधानसभेला इच्छुक असलेल्या पण तिकीट न मिळालेल्या उमेदवारांनी नाराजी व्यक्त करत बंडाचे निशाण फडकवले आहे. विशेष म्हणजे काही मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता दिसून येते. कारण, महायुती व महाविकास आघाडीतील दोन्ही घटक पक्षांनी उमेदवारी दाखल केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच, मंत्री अब्दुल सत्तार (Abdul sattar) यांच्या सिल्लोड मतदारसंघात महायुतीमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. अब्दुल सत्तार यांनी थेट रावसाहेब दानवे यांनाच इशारा दिला. त्यानंतर, रावसाहेब दानवे यांनीही अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करताना चक्क औरंगजेबाची उपमा त्यांना दिली आहे. दरम्यान, सिल्लोडमधून अब्दुल सत्तार शिवसेना महायुतीचे उमेदवार आहेत, तर कन्नडमधून रावसाहेब दानवे (Raosaheb Danway) यांच्या कन्या संजना जाधव याही शिवसेना महायुतीच्या उमेदवार आहेत. 


विधानसभा निवडणुकीपूर्वीच अब्दुल सत्तारांनी महायुतीत फटाके फोडून नवं आव्हान उभं केलं आहे. महायुतीत सिल्लोड विधानसभा मतदारसंघात ज्या पद्धतीने युतीधर्म निभावला जाईल तशीच साथ माझी कन्नड, फुलंब्री आणि भोकरदन मतदारसंघात असेल. जर सिल्लोडमध्ये महायुती धर्म पाळला नाही तर, महायुती धर्माविरोधात फटाके फोडेल, असा थेट इशारा अब्दुल सत्तार यांनी दिला आहे. त्यानंतर, आता रावसाहेब दानवे यांनीही पलटवार केलाय.. मी अनेक वेळेस सांगतो, घाबरतो कुणाला. औरंगजेब येऊन आमच्या शिवाजी महाराजांच्या लोकांना घाबरवतो का? तू का रजाकार आहे का? कुत्ता निशाणीवर निवडून येईल म्हणतो, लोकांना गृहीत धरले आहे का, अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी नाव न घेता पण थेट अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला.


मुलीच्या मतदारसंघात तीची यंत्रणा


एक विशिष्ट लोक त्यांचं ऐकतील, भोकरदन तालुक्यात त्यांचं कुत्रा एकेत नाही. मी युती धर्म पाळणार, त्यांनी माझ्या विरोधात प्रचार केला. मला जर पक्षाने सांगितले तर सिल्लोडमध्ये प्रचारसाठी जाईल, असेही रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले. मात्र, अब्दुल सत्तार यांच्यावर बोचरी टीका केली. त्यामुळे, छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीत जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, सत्तार यांनी कन्नड मतदारसंघात बंडखोरीबाबत केलेल्या विधानावरही दानवेंनी भूमिका स्पष्ट केली. माझी मुलगी युतीचा भाग आहे, माझ्याकडे वेळ कमी आहे, त्यांची स्वतःची फळी आहे, असे म्हणत मुलगी सक्षम असल्याचं त्यांनी सुचवलय.


हेही वाचा


मी मंत्री आहे, आता राज ठाकरेंनी पक्ष बंद करावा; रामदास आठवलेंचा मनसे अध्यक्षांवर पलटवार