Dharashiv Vidhansabah Election News : शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या विरोधात धाराशीवचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे आक्रमक झाले आहेत. तानाजी सावंत यांना गद्दार, खेकडा, खोकेवाला म्हटल्यावर पहिल्यांदा मी धावून गेलो होतो. पण माझ्यावर अन्याय झाल्याची भावना साळुंखे यांनी व्यक्त केली. त्यामुळं आता तानाजी सावंत यांच्याशी संवाद संपला असल्याची भूमिका शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे (Suraj Salunkhe) यांनी घेतलीय. 


तानाजी सावंत यांनीच शिवसेनेवर अन्याय केला


उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाने अजित पिंगळे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपमधून आलेला अजित पिंगळे यांना उमेदवारी दिल्याने शिवसेना पदाधिकारी बंडाच्या पवित्र्यात आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांच्यासह शिवाजी कापसे आणि सुधीर पाटील या शिवसेना शिंदे गटाच्या प्रमुख उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माजी मंत्री तानाजी सावंत यांनीच शिवसेनेवर अन्याय केल्याची भावना सुरज साळुंखे यांनी व्यक्त आहे. तानाजी सावंत यांना खेकडा, गद्दार म्हणल्यावर मी धावून गेलो मात्र आज अन्याय झाला. यापुढे तानाजी सावंत यांच्याशी संवाद संपल्याचाही साळुंखे म्हणाले. तसेच शिवसैनिकांसाठी लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघातून अनेकजण इच्छुक होते. मात्र, भाजपच्या अजित पिंगळे यांना शिवसेना शिंदे गटाकडून धाराशिवची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं अनेकजण नाराज आहेत. स्वत: तानाजी सावंत यांचे पुतणे देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. त्याचबरोबर जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे देखील इच्छुक होते. मात्र, शिवसेना शिंदे गटाकडून अजित पिंगळे यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. आता धाराशीवची लढत ही  कैलास पाटील विरुद्ध अजित पिंगळे असी होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कैलास पाटील हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळं आता इथं शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना ठाकरे गट असाच सामना रंगमार आहे. मात्र, अनेकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. अर्ज माघार घेम्याची तारीख ही 4 नोव्हेंबर आहे. त्यामुळं 4 नोव्हेंबरनंतरच मतदारसंघातील खरं चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर 20 नोव्हेंबरला मतदान आहे, तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. 


महत्वाच्या बातम्या:


उद्धव ठाकरे रॉकेट, शरद पवार सुतळी बॉम्ब तर राहुल गांधी लक्ष्मी तोटा, तानाजी सावंत नागगोळी, ओमराजेंनी फोडले राजकीय फटाके