शिवसेनेच्या राजेंद्र गावितयांना 5 लाख 79 हजार 989 मत मिळाली तर बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांना 4 लाख 91 हजार 391 मत मिळाली. पालघरमध्ये 12 उमेदवार रिंगणात असून उर्वरित उमेदवारापेक्षा नोटाला तिसऱ्या क्रमांकाची म्हणजे तब्बल 29 हजार 463 मत मिळाली आहे.
पालघरमधील जनतेचा मी आभारी असून येथील समस्या आणखी लवकर सोडवण्याचा मी प्रयन्त करेन असं मत राजेंद्र गावीत यांनी व्यक्त केलं आहे. तर पालघरसह महाराष्ट्रातील सर्वच जागांवर जनतेने महायुती वर विश्वास दाखवला असून त्यांला आम्ही पूर्ण करु. तसेच पालघर मधील गुंडगिरी आम्ही मोडून काढली अशा शब्दात राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुजन विकास आघाडीवर टिका केली आहे.
Loksabha Result | अभूतपूर्व विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद | कौल मराठी मनाचा | ABP Majha
पालघर लोकसभा मतदारसंघात युराजेंद्र गावित यांच्यासाठी युतीने सगळी ताकद पणाला लावली होती. शिवसेना-भाजपची युती झाली त्यावेळी पालघर मतदारसंघ आम्हाला सोडण्याची अट शिवसेनेने ठेवल्याचं बोललं जातं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी ही लढत प्रतिष्ठेची बनली होती
शिवसेनेनं श्रीनिवास वनगा यांना तिकीट देण्याचे आश्वासन दिलं होतं. मात्र ऐन वेळी पोटनिवडणुकीत विजयी ठरलेले भाजपाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेनं त्यांना तिकीटही दिलं.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत याठिकाणी भाजपच्या राजेंद्र गावित हे विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांचा पराभव केला. या पोटनिवडणुकीतील महत्त्वाची बाब म्हणजे 2014 मध्ये शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार चिंतामण वनगा याठिकाणी विजयी झाले होते, मात्र पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजप यांच्या प्रमुख लढत याठिकाणी पाहायला मिळाली होती.
2009 लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांनी भाजपच्या चिंतामन वनगा यांचा पराभव केला होता. मात्र 2014 च्या निवडणुकीत 2009 च्या पराभवाचा वचपा काढत, चिंतामण वनगा याठिकाणी विजयी झाले होते. या निवडणुकीत चिंतामन वनगा यांना 5,33,201 मतं पडली होती. तर बळीराम जाधव यांना 2,93,681 मतं मिळाली होती.
विधानसभा मतदारसंघ
डहाणू
विक्रमगड
पालघर
बोईसर
नालासोपारा
वसई