मुंबई : लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार देशात भाजपप्रणित एनडीएला 343 जागांवर आघाडी मिळाली आहे तर काँग्रेस आघाडीला 86 जागांवर आघाडी मिळाली आहे. 112 जागांवर सपा, बसपासह देशातील इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना आघाडी मिळाली आहे. महाराष्ट्रातील 48 जागांचा विचार केला तर भाजप 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी 5, काँग्रेस 1 आणि वंचित आघाडीने एका जागेवर आघाडी मिळवली आहे. एनडीएला मिळालेल्या या बहुमताबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकांनी मोदींचं नेतृत्व देशाने स्वीकारले आहे.


देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीएला आणि राज्यात महायुतीला लोकांनी बहुमत दिले आहे. देशात मोदींजींच्या बाजूने एक लाट होती, जीचे आता त्सुनामीत रुपांतर होत आहे. राज्यात दुष्काळ आहे, देशभरात अनेक समस्या आहेत, तरिदेखील नरेंद्र मोदी जनतेला सर्व समस्यांमधून बाहेर काढतील, अशी जनतेला अपेक्षा आहे. म्हणून लोकांनी आम्हाला भरभरून मतदान केले आहे.

व्हिडीओ पाहा



फडणवीस म्हणाले की, देशातला मध्यमवर्गीय आणि गरीब नागरिक मोदींना निवडून देण्यासाठी उत्सूक आहे. देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व विजय मोदीजींनी मिळवला आहे. महाराष्ट्रातील जनतेसमोर सध्या अनेक अडचणी आहेत, या अडचणींचा सामना करत जनतेने आम्हाला (महायुतीला) भरभरुन मतदान केले आहे.

Maharashtra Election Results 2019 : महाराष्ट्रात काँग्रेसचं पतन का झालं?

बारामतीत सुप्रिया सुळे जिंकूनही शरद पवारांचा ईव्हीएमवर अविश्वास कायम