नाशिक : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे नाशिक लोकसभा मतदारसंघातून दोन लाखांहून अधिक मतांनी विजयी झाला आहे. राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांचा पराभव केला आहे. नाशिककर एकदा निवडून दिलेला लोकप्रतिनिधी दुसऱ्यांदा निवडून देत नाहीत, असा इतिहास आहे. मात्र यंदा हेमंत गोडसेंनी नवा इतिहास रचला आहे.

हेमंत गोडसेंनी या निवडणुकीत आपलाच विक्रम मोडला आहे. मागील निवडणुकीत हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ यांचा 1 लाख 87 हजार मतानी केला होता पराभव केला होता. या निवडणुकीत हेमंत गोडसेंना 4लाख 30 हजार 8 मतं मिळाली तर समीर भुजबळ यांना 2 लाख 21 हजार 355 मतं मिळाली. तर या निवडणुकीत बंडखोर अपक्ष माणिकराव कोकाटे यांना 1 लाख 6 हजार 917 मतं मिळाली आहेत. निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघातून 18 उमेदवारांनी आपलं नशीब आजमावलं. त्यात शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यात मुख्य लढत होती.

Loksabha Result | विरोधीपक्ष म्हणून उभा राहिलेला पक्ष पूर्णपणे जमीनदोस्त- संजय राऊत | ABP Majha



नाशिक लोकसभा मतदारसंघ हा तसा राष्ट्रवादीचा गड. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत या गडाला शिवसेना-भाजपने सुरुंग लावला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच तगडे नेते छगन भुजबळ हे येथून नेतृत्व करतात. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांना पराभूत केले होते.

मतदारसंघातील विधानसभा क्षेत्र

सिन्नर
इगतपुरी
नाशिक पूर्व
नाशिक पश्चिम
नाशिक मध्य
देवळाली