जालना : लोकसभा 2019 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या वादामुळे चर्चेत आलेली जालना लोकसभा मतदारसंघाच भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पुन्हा एकदा विजय झाला आहे. रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसच्या विलास केशवराव औताडे यांचा पराभव केला आहे.


जालन्याची जागा युतीमध्ये भाजपच्या वाट्याला आली तरीही यासाठी रावसाहेब दानवे पुन्हा एकदा ही जागा मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने जालन्याची जागा मागितली होती शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर जालन्याच्या जागेवर लोकसभेचे तिकीट मिळावं यासाठी आग्रही होते. परंतु अनेक चर्चा आणि समजुतीनंतर भाजपकडून दानवे यांना उमेदवारी देण्यात आली.

Exit Poll | महाराष्ट्रात युतीला 42 च्या वरच जागा मिळतील, रावसाहेब दानवेंना विश्वास | ABP Majha



2014 च्या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसच्या विलास आवताडे यांचा पराभव केला होता दानवे यांना पाच लाख 91 हजार 428 मते मिळाली होती तर औताडे यांना तीन लाख 84 हजार 630 मते मिळाली होती.

जालन्यातील विधानसभा क्षेत्र

पैठण

जालना

बदनापूर

भोकरदन

फुलंब्री

सिल्लोड