नागपूर : महाराष्ट्रातील 288 विधानसभा निवडणुकांच्या निकालाची अपडेट हाती येत असून भाजप महायुतीला तब्बल 200 पेक्षा जास्त जागांवर आघाडी पाहायला मिळत आहे. त्यामुळे, राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार असे चित्र दिसून येते. या निकालानंतर भाजप महायुतीलमधील सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष व्यक्त केला आहे. एकीकडे भाजप नेत्यांकडूनही पेढे वाटून जल्लोष केला जात असताना, दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या कार्यालयात शुकशुकाट झाल्याचे चित्र आहे. तर, भाजपने 100 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा रंगली आहे. त्यातच, देवेंद्र फडणवीस यांचे सख्खे भाऊ आशिष फडणवीस यांनी आनंद व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत, असेही त्यांनी म्हटले.
निकालाची अपेक्षा होती, असे निकाल येतील असे नाही पण सकारात्मक निकाल येतील असा विश्वास होता. कारण, लोकसभा निवडणुकीनंतर जी मेहनत सर्वांनी घेतली, त्यामुळे निकाल खूप चांगला आला. गेल्या 6 महिन्यांपासून मायक्रो लेव्हलवर काम सुरू होतं, ग्रासरुट लेव्हलपर्यंत काम केल्याशिवाय असा निकाल येत नाही. देवेंद्र फडणवीस हे गेल्या टर्ममध्ये मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. देवाभाऊंचा हा सर्वात स्ट्राँग पॉइंट आहे की, ही डसन्ट केअर अबाऊट... त्यांना पदाची काही फिकर नाही. राजकारणामध्ये पदं येत राहतात आणि जात राहतात, पण आपलं काम करत राहणे हीच देवाभाऊंची विशेषत: आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांचे सख्खे भाऊ आशिष फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. महायुतीला जे यश मिळतंय, त्यामध्ये भाजप मोठा पक्ष आहे. त्यामुळे, मुख्यमंत्रीपदाची संधी त्यांना मिळायला हवी, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केलीय.
संजय राऊत यांची स्फोटक प्रतिक्रिया
निकालामध्ये गडबड आहे, पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर झालेला आहे. एकनाथ शिंदे सर्व आमदार कसे काय निवडून आणू शकतात. ज्यांच्या गद्दारीवर महाराष्ट्रात रोष आहे, त्या अजित पवारांच्या बेईमानीविरुद्ध महाराष्ट्रात प्रचंड रोष आहे. शरद पवारांच्या सभांना तुफान प्रतिसाद मिळत होता, हे वादळ तुम्हाला दिसत नाही. पण, आज जागा जिंकल्यावरती युतीचं वादळ, युतीचं वादळं म्हणताय. आता, मीडियानेच स्वत:ला हा प्रश्न विचारावा, गडबड आहे की नाही?, अशा शब्दात संजय राऊत यांनी हातील आलेल्या निकालवरुन तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची निराशा झाली असून नेत्यांच्या कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
हेही वाचा
Video: निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले