पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येऊ लागले आहेत. गेल्या महिन्याभरापासून विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024 Result) धामधूम सुरू आहे. या निवडणुकीत बारामती (Baramati Election Result) हा मतदासंघ सुरूवातीपासून चर्चेत राहिला आहे. या मतदारसंघात कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. दरम्यान, आज 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीदरम्यान बारामती मतदारसंघाचा पहिला कल हाती आला आहे. मतमोजणीच्या पहिल्याच कलात शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार (Yugendra Pawar) हे आघाडीवर होते. त्यानंतर काही वेळातच चित्र पालटलं आणि अजित पवारांनी 3623 मतांनी आघाडी घेतली आहे.


पोस्टल मतमोजणीमध्ये  युगेंद्र पवार (Yugendra Pawar) हे आघाडीवर होते. त्यानंतर सुरू झालेल्या पहिल्या फेरीमध्ये बारामतीत अजित पवार 3623 मतांनी आघाडीवर आहेत. आत्तापर्यंत हाती आलेल्या कलानुसार अजित पवार यांना पडलेली मते 9291 इतकी आहेत. तर युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांना पडलेली मते 5,668 इतकी आहेत. अजित पवारांची (Ajit Pawar) पहिल्या फेरीत आघाडी घेतली. सुपे भागातील मतमोजणीचा पहिल्या मतमोजणीत समावेश आहे.


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान 20 तारखेला पार पडले होते. त्यानंतर आज आज मतमोजणी होत आहे. प्रथम पोस्टल मतांची मतमोजणी सुरू होत झाली असून अवघ्या काही क्षणात पहिला कल हाती आला तेव्हा युगेंद्र पवार (Yugendra Pawar) आघाडीवर होते, त्यानंतर आता चित्र पालटलं आहे. बिग फाईट असलेल्या बारामती मतदारसंघामध्ये (Baramati Election Result) सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


2019 मध्ये काय घडलं?


बारामती विधानसभेला (Baramati Election Result) 2019 मध्ये अजित पवार यांनी भाजपचे  उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा दारुण पराभव केला होता. त्यांनी 1 लाख 95 हजार 641 मते मिळवली होती. पडळकर यांना अवघी 30 हजार 376 मते मिळाली होती. ते 1991 पासून बारामती विधानसभा मतदारसंघाचे (Baramati Election Result) प्रतिनिधित्व करत आहेत. अजित पवार सर्वाधिक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. सध्या ते पाचव्यांदा या पदावर आहेत. त्यामुळे  अजित पवार यांच्यासमोर मताधिक्य राखण्यापासून ते विजयश्री कायम राखण्यापर्यंत संघर्ष करावा लागणार आहे.


बारामतीत मतमोजणीच्या 20 फेऱ्या


दरम्यान, सध्या मतमोजणी चालू आहे. बारामतीत मतमोजणीच्या एकूण 20 फेऱ्या होत आहेत. सध्यातरी पहिल्याच फेरीतील मतमोजणी चालू आहे. पुढच्या काही तासांत बारामती मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होईल. बारामतीच्या निकालाकडे संपूर्ण राज्यासह देशाचंही लक्ष लागलेलं आहे.