Vidhansabha Election News : महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) काही जागांवरुन सांगली पॅटर्न (Sangli Pattern) होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत शिवसेना (Shivsena) आणि काँग्रेसमध्ये (Congress) काही जागांवर मतभेद असल्याचं पाहायला मिळत आहेत. मुंबईतील 4 ते 5 जागी शिवसेनेने चर्चा न करताच उमेदवार जाहीर करून  AB फॅार्म वाटले आहेत. तर महाराष्ट्रातही 7 ते 8 ठिकाणी चर्चा न करता उमेदवार जाहीर करून AB फॅार्म दिले आहेत.  त्यामुळं शिवसेना आणि काँग्रेसमध्ये 10-12 जागांवरील मतभेद विकोपाला गेले आहेत.   


परस्पर उमेदवार दिल्याने काँग्रेस पक्ष श्रेष्ठी नाराज 


चर्चा न करताच शिवसेना ठाकरे गटानं परस्पर उमेदवार दिल्याने काँग्रेस पक्ष श्रेष्ठी नाराज आहेत. या जागांवर काँग्रेसनेही उमेदवार तयार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.  वादग्रस्त जागांवर काँग्रेसही आपल्या उमेदवारांना AB फार्म देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळं या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता वर्तवली जातेय.