Rahul Narvekar wealth : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी कुलाबा विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्ती आणि इतर बाबींचा उल्लेख केला आहे. या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, राहुल नार्वेकरांच्या नावे 35 कोटी रुपयांची एकूण मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावे 93 कोटी 53 लाख रुपयांची एकूण मालमत्ता आहे. तसेच राहुल नार्वेकर यांच्यावर 17 कोटी रुपयांचे कर्ज देखील आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
राहुल नार्वेकरांच्या नावे 35 कोटी रुपयांची एकूण मालमत्ता
राहुल नार्वेकरांच्या नावे 35 कोटी रुपयांची एकूण मालमत्ता आहे. तर पत्नीच्या नावे 93 कोटी 53 लाख रुपयांची एकूण मालमत्ता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्ती आणि इतर बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. राहुल नार्वेकर यांच्याकडे 7 कोटी 17 लाख तर पत्नीच्या नावे 8 कोटी 53 लाखांची जंगम मालमत्ता आहे. तर राहुल नार्वेकर यांच्या नावे जवळपास 28 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता तर पत्नीच्या नावे 85 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
राहुल नार्वेकर यांच्यावर 17 कोटी रुपयांचे कर्ज
राहुल नार्वेकर यांच्यावर 17 कोटी रुपयांचे कर्ज तर 66 कोटी रुपयांचे कर्ज पत्नीवर देखील आहे. राहुल नार्वेकरांकडे चार चारचाकी गाड्या, ज्यात मर्सिडीज बेंझ, इनोव्हा क्रिस्टा, महिंद्रा एक्ययूव्ही आणि फॉर्च्युनर यांचा समावेश आहे. राहुल नार्वेकर यांच्याकडे 160 ग्राम सोनं आहे. ज्याची किंमत जवळपास 11 लाख 68 हजार रुपये आहे. त्यांच्या पत्नीकडे जवळपास 660 ग्राम सोनं असून ज्याची किंमत 48 लाखांच्या घरात आहे.
नार्वेकरांना उमेदवारी दिल्यामुळं राज पुरोहित नाराज
राहुल नार्वेकर यांच्या उमेदवारीला माजी आमदार राज पुरोहित यांनी विरोध केला आहे. राज पुरोहित आज थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती. राज पुरोहित बंडखोरी करणार असल्याची चर्चा आहे. 2019 मध्ये राज पुरोहित यांचा पत्ता कट करत भाजपकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. आता त्यांना दुसऱ्यांदा याच मतदारसंघातून रिंगणात उतरवण्यात आलं आहे. त्यामुळे राज पुरोहित हे नाराज झाले आहेत. कुलाब्यासह राज्यातील अनेक ठिकाणच्या मतदारसंघामध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. कारण इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळं प्रत्येक राजकीय पक्षात नाराजी नाट्य मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या: