Manoj Jarange Patil : मी किंवा माझ्या जवळचे कोणीही इच्छुक उमेदवारांना तिकिटासाठी पैसे मागत नाहीत. आपलं तिकीटही किंवा पाठिंबाही फुकट असल्याचे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी व्यक्त केलं आहे. कुणीही पैशाचा व्यवहार करू नये अशी विनंती देखील मनोज जरांगे यांनी केली आहे. माझ्या पाठिंबाच्या नावाखाली पैसे मागितल्याची चर्चा सुरु असल्याचे मनोज मनोज जरांगे यांनी सांगितलं.
आपलं तिकीट किंवा पाठिंबा हा फुकट असून कुणीही पैशाचा व्यवहार करु नये अशी विनंती देखील मनोज जरांगे यांनी केली आहे. माझ्या पाठिंबाच्या नावाखाली पैसे मागितल्याची चर्चा सुरु होती. याबाबत बोलताना जरांगे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपलं तिकीट आणि पाठिंबा फुकट असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी अनेकजण अंतरवाली सराटीत
विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. अनेक राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहे. राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना देखील अनेकजण भेटायला येत आहेत. आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मनोज जरांगे यांची जालन्यातील अंतरवाली सराटीत भेट घेतली. दोघांमध्ये अर्धा तास झालं चर्चा सुरु आहे. शिरसाट हे छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा क्षेत्रातून शिवसेनेचे उमेदवार आहेत. दरम्यान, मंत्री उदय सामंत यांनी यांनी देखील कालच मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीत भेट घेतली होती. त्यानंतर लगेच आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी देखील आज अंतरवली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतलीय. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसापासून शिंदे गटाच्या आमदारांच्या मनोज जरांगे पाटील यांच्याशी गाठी भेटी वाढल्या आहेत. त्यामुळं विविध चर्चांना उधाण आलं आहे.
संदीप क्षीरसागरांनी घेतली घेतली मनोज जरांगेंची भेट
अंतरवाली सराटीत आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते संदीप क्षीरसागर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. दोघांमध्ये जवळपास 20 ते 25 मिनिट चर्चा झाली. आपली किंवा पक्षाची भूमिका लपलेली नसून आपण अंधारात नाही तर दिवसा भेटायला आलो आहे. आपण जरांगे यांची भूमिका आणि त्यांच्या विचारांसोबत असल्याची प्रतिक्रिया यावेळी संदीप क्षीरसागर यांनी दिली आहे. संदीप क्षीरसागर यांना शरद पवार गटाकडून बीड विधानसभेची उमेदवारी मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या: