Ajit Pawar : बारामतीचा मतदार माझा परिवार आहे. बारामतीच्या विकासात माझा खारीचा वाटा असल्याचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. तसेच  सुप्रिया सुळे यांचा देखील मोठा वाटा असल्याचे अजित पवार म्हणाले. काल महायुतीच्या प्रचाराचा नारळ आम्ही फोडला आहे. आमचा युतीचा जाहीरनामा येणार आहे. पण पक्षाचा जाहीरनामा येत आहे. ज्या भागात आमचे उमेदवार आहेत, तिथं वेगळे जाहिरनामे असतील. महाराष्ट्रमधील सगळ्यात जास्त निधी बारामतीत आणल्याचे अजित पवार म्हणाले. 


बारामतीला पहिले सौरऊर्जा शहर बनवण्याचा प्रयत्न 


बारामतीला पहिले सौरऊर्जा शहर बनवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे अजित पवार म्हणाले. तसेच कॅन्सर हॉस्पिटलही उभारणार आहे. त्याचबरोबर लॉजेस्टिक पार्क उभारणार आहे. शिक्षण, दर्जेदार रस्ता, शेतीच्या विकासाचा वादा, सामाजिक विकासाचा वादा पूर्ण करणार असल्याचे अजित पवार म्हणाले. कालची आश्वसने दिली आहेत. आम्ही दिलेली आश्वासने सांभाळता येण्यासारखी आहेत. कुठं आपल्याला बचत करता येईल ते पाहण गरजेचं असल्याचे अजित पवार म्हणाले. केंद्र सरकार त्यांच्या विचाराचे नसल्याने त्यांच्याकडून मदत जास्त मिळणार नाही. आमचं सरकार असल्यावर केंद्राकडून जास्त निधी मिळेल असेही अजित पवार म्हणाले. 


निवडणुकीमध्ये उतरतो तेव्हा समोरचा उमेदवार स्ट्रॉंग आहे असं म्हणूनच लढत


मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीला सांगितले होते की, लढणार परत त्यांनी ठरवले मागे घेणार. त्यांनी सांगितले चांगल्या उमेदवाराला मत द्या असे अजित पवार म्हणाले. मला पक्षाने सांगितले इथे उभा राहा. माझ्या समोर कोणतरी उभं राहणार आहे. मी लढू शकत नाही का? जेव्हा निवडणुकीमध्ये उतरतो तेव्हा समोरचा उमेदवार स्ट्रॉंग आहे असं म्हणूनच लढत असतो. साहेबांनी कौतुक केलं की चांगलं वाटतं असे अजित पवार म्हणाले. 


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील करताना दिसत आहेत. दरम्यान, या विधानसभेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी अटितटीच्या लढती होत आहेत. यातीलच एक लढत म्हणजे बारामती विधानसभा मतदजारसंघातील लढत. या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हे मैदानत आहेत. त्यामुळं या लढतीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे, तर 23 तारखेला निकाल लागणार आहे.