Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभेचे निकाल हाती येऊ लागले आहेत. अनेक मतदारसंघात 4 ते 5 फेऱ्यांची मतमोजणी पार पडली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला महायुतीला खटाखट मतं मिळाली आहे. महायुतीने 288 पैकी 228 जागांवर महायुतीने आघाडी मिळवली आहे. तर महाविकास आघाडीला केवळ 52 जागांवर आघाडी मिळवता आली आहे. 


4 ते 5 फेऱ्यांची मतमोजणी पार पडल्यानंतर भारतीय जनता पार्टी 128 जागांवर आघाडीवर आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 35 जागांवर मुसंडी मारली आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेने 55 जागांवर आघाडीवर घेतली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला केवळ 57 जागांवर आघाडीवर मत मिळाली आहेत. 


शरद पवारांची राष्ट्रवादी 18 जागा, ठाकरेंची शिवसेना 17 जागा तर काँग्रेस पक्ष 22 जागांवर आघाडी मिळवताना दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महायुतीला खटाखट मतं मिळाली असून महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते विधानसभा निवडणुकीत पराभवाच्या छायेत दिसत आहेत. 


लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात मोठा फटका बसला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीने लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवली. त्यामुळे महायुतीला मतदारांनी मोठ्या प्रमाणात साथ दिल्याचं चित्र आहे. दरम्यान, महायुतीच्या बाजूने कल हाती आल्यानंतर महायुतीचे नेते सेलीब्रेशन करताना दिसत आहेत. 


विधानसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेलं यश अतियश महत्त्वपूर्ण आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असं चित्र होतं. मात्र, शिवसेनेने वेगळी भूमिका घेतल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रि‍पदापासून वंचित राहावे लागले होते. त्यानंतर अडीच वर्षांनी महायुतीचे सरकार आले, मात्र महायुतीने मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रिपद जाण्याची शक्यत आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Maharashtra Assembly Election Result 2024 LIVE: पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघात पाचव्या फेरी अखेरीस भाजपचे हेमंत रासने आघाडीवर; 6919 मतांची आघाडी