Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. दरम्यान, मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय. महाविकास आघाडीचे नेते अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवार आणि बंडखोरांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे आज (दि.21) महाविकास आघाडीचे नेते ग्रँड हयात या हॉटेलवर बैठकीसाठी एकत्र आलेले पाहायला मिळाले. या बैठकीला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, काँग्रेस नेते सतेज पाटील देखील उपस्थित होते. 


ग्रँड हयातवरील बैठक संपल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते मातोश्रीवर 


ग्रँड हयातवरील बैठक संपल्यानंतर संजय राऊत, जयंत पाटील आणि सतेज पाटील मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला निघाले आहेत. दरम्यान, राज्यात कोणाचं सरकार येणार याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेले असताना देखील शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या निवडणुकीनंतर कोणाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही, किंवा काठावरचं बहुमत मिळालं? तर मोठ्या घडामोडी घढण्याची शक्यता नाकारता येत नाही.


काही तासांत मतदानाने जोर पकडल्याचं चित्र राज्याच्या काही भागांत पाहायला मिळालं


 विधानसभा निवडणुकीत यंदा (Vidhan Sabha Elections 2024) राज्यात सरासरी 65 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections 2024) तुलनेत या निवडणुकीत मतांचा टक्का वाढल्याचं दिसतं. अखेरच्या काही तासांत मतदानाने जोर पकडल्याचं चित्र राज्याच्या काही भागांत पाहायला मिळालं. त्यामुळे जादा झालेलं मतदान कोणाच्या पारड्यात गेलं? आणि या निवडणुकीत कोणाला धक्का बसणार? हे 23 डिसेंबरला होणाऱ्या मतदानातच स्पष्ट होईल. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी राज्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 65.11 टक्के मतदान झालं आहे. संपूर्ण आकडेवारी हाती आल्यानंतर मतदान 68 टक्क्यांच्या घरात जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.  दरम्यान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान झालं? जाणून घेऊया.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?


Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?