Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला. मित्रपक्षाची यादी आलेली नाही. त्यामुळे एका जातीवर निवडणूक लढणं आणि जिंकणं शक्य नाही. त्यामुळे समाज बांधवांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत. उमेदवार द्यायचा नाही, आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी (दि.४)  केलं. त्यानंतर जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर 45 उमेदवाराकडून आपले अर्ज मागे घेतले असून दोघांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.


तुळजापूरमधून योगेश केदार तर भूम परंडा वाशीमधून दिनेश मांगले जरांगेंचा आदेश डावलत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मनोज जरांगे समर्थक असल्याचं सांगत, दोघांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. मनोज जरांगे यांनी विधानसभा  निवडणुकीतून माघार घेतली, मात्र दोघांनी अर्ज माघे घेतले नाहीत.


धाराशिव जिल्ह्यामध्ये चार मतदारसंघात 47 मनोज जरांगे पाटील समर्थकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर 45 उमेदवाराकडून आपले अर्ज मागे घेण्यात आले असून दोघांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. भूम परंडा वाशी मधून दिनेश मांगले तर तुळजापूर मतदारसंघातून योगेश केदार यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे न घेता कायम ठेवले आहेत.  दोघेही आपण मनोज जरांगे समर्थक असल्याचं सांगत होते.


कोणत्याही अपक्षाला पाठिंबा नाही


मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, सर्व उमेदवारांनी आपले अर्ज मागे घ्यावेत. आपण कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा दिलेला नाही. राखीव असो किंवा इतर जागा असोत तेथे आमचा पाठींबा अद्याप तरी जाहीर केलेला नाही, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं.