Aurangabad East Constituency: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी अनेकांनी अर्ज मागे घेतले असून अनेक बंडखोर रिंगणात कायम असल्यानं मविआ आणि महायुतीला जबर धक्के बसले आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेससाठी शिवसेनेने अर्ज मागे घेतल्याचे दिसून आले. मात्र, काँग्रेसनं आभार मानण्याऐवजी भाजपचे उमेदवार अतुल सावे यांनी आभार मानत खैरेंचे पाय धरल्याचे दिसले. औरंगाबाद पूर्वमधून एमआयएमचे इम्तियाज जलीलही निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं हिंदू मतांचे विभाजन होईल अशी भाजपला धास्ती होती. मात्र, राजू वैद्य यांच्या उमेदवारी अर्ज माघारीने शिवसेना उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराची माघार भाजपच्याच पथ्यावर पडल्याचे दिसतेय.
औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजू वैद्य यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजप आनंदल्याचे चित्र होते. काँग्रेसनं आभार मानायचे तर भाजपचे औरंगाबात पूर्वचे महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांनी आभार मानत खैरेंचे पाय धरल्याचे दिसले.
महायुतीत 3 आघाडीत 2 मतदारसंघात बंडखोरी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुतीत तीन तर महाविकास आघाडत दोन मतदारसंघात बंडखोरी झाल्याचे दिसले. उर्वरित मतदारसंघात बंडखोरी शमवण्यात महायुतीला आणि मविआला यश आल्याचे चित्र होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत सोमवारी दुपारी ३ वाजता संपली. दरम्यान, औरंगाबाद पूर्व मतदारसंघात सर्वाधिक 29 उमेदवार आहेत. याच मतदारसंघातून उद्धवसेनेच्या राजू वैद्य यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपने सुस्कारा सोडल्याचे चित्र होते.
काँग्रेससाठी उद्धवसेनेची माघार, भाजपला आनंद
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार राजू वैद्य यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. खरंतर काँग्रेसनं त्यांचे आभार मानायला हवे होते. पण भाजपाचे उमेदवार अतुल सावे यांनी त्यांचे आभार मानले आणि खैरेंच्या पायाही पडले. एमआयएमकडून इम्तियाज उभा आहेत आणि त्यामुळे हिंदू मतांचे विभाजन होऊ नये यासाठी भाजपच आनंदून गेल्याचं चित्र होते.
औरंगाबाद पूर्वमधून कोणाची उमेदवारी?
औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून अतुल सावे हे महायुतीचे उमेदवार आहेत. तर काँग्रेसचे लहू शेवाळे महाविकास आघाडीकडून उभे आहेत. तर दुसरीकडे इम्तियाज जलील, डॉ गफार कादरी आणि अफसर खान यांचीही उमेदवारी आहे.