Prabhakar Deshmukh : माण खटाव विधानसभेसाठी (Man Khatav Assembly constituency) शरद पवार गटाकडून प्रभाकर देशमुख हे (Prabhakar Deshmukh) उमेदवार असण्याची दाट शक्यता होती. मात्र, त्यांना पक्षातून जोरदार विरोध झाला आहे. संभाव्य इतर इच्छुक अभयसिंह जगताप, रणजित देशमुख, अनिल देसाई, प्रभाकर घार्गे या सर्वांनी एकत्रित येत प्रभाकर देशमुख उमेदवार असतील तर आम्ही त्यांना मदत करणार नाही अशी भूमिका घेतली होती. यानंतर  प्रभाकर देशमुखांनी निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली आहे. त्यांनी ट्वीटरवर एक पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

  


थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारांची तिसरी यादी येणार 


शनिवारी याबाबत शरद पवारांच्या उपस्थिती वाय बी चव्हाण सेंटर येथे इच्छुक असणाऱ्या सर्व उमेदवारांची बैठक पार पडली. यात शरद पवारांनी प्रभाकर देशमुख यांच्या वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. यांनंतर प्रभाकर देशमुख नाराज असल्याची चर्चा होती. प्रभाकर यांनी आपली नाराजी दर्शवताना आता थेट निवडणुकीतूनच माघार घेण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारांची तिसरी यादी येणार आहे. यात माण खटाव विधानसभेच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वीच प्रभाकर देशमुख यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली आहे.


पोस्टमध्ये प्रभाकर देशमुखांनी नेमकं काय म्हटलंय?


गेल्या अनेक वर्षापासून मी आपणा सर्वांच्या साथीनं माण खटावच्या विकासासाठी सक्रियपण कार्यरत आहे. मी नेहमीच जलयुक्त आणि भयमुक्त माण खटावसाठी प्रयत्न केले. या प्रवासात अनेक माणसे भेटत गेली. अनेकांच्या सुख दु:खात सहभागी झालो. आजवर तुन्ही दिलेलं प्रमे, आशीर्वाद आणि शुभेच्छांसाठी मी आपला सदैव ऋणी आहे. मी कायमच आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आपण सर्वांनी मला माण खटावच्या भवितव्यासाठी कायम साथ दिलीत. परंतू, वर्तमानातील काही घडामोडींमुलं आगामी विधानसभा निवडणूक मी लढवणार नाही. 


शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सेवेत कायम राहील


याबाबत मी आपणा सर्वांचीच दिलगिरी व्यक्त करतो. जरी ही निवडणूक लढणार नसलो तरीसुद्धा इथून पुढे ताकदीने मनगटात बळ आहे तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सेवेत कायम राहील. आपले प्रमे व शुभेच्छा अशाच कायम माझ्यावर राहुद्यात. 


महत्वाच्या बातम्या:


Man Vidhan Sabha Election 2024 : माणचा मानकरी कोण होणार? जयकुमार गोरेंविरोधात कोण लढणार? शरद पवारांच्या निर्णयावर मविआची रणनीती ठरणार