Maharashtra Vidhan Sabha Consituncy Result: राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत काँटे की टक्कर पाहायला मिळाली होती. पण, विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मतांचं दान महायुतीच्या पारड्यात टाकल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना (शिंदे गट), भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीला राज्यातील जनतेनं स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे आता पुढच्या पाच वर्षांसाठी राज्यात महायुतीचंच सरकार येणार, हे जवळपास स्पष्ट झालं आहे. अशातच गेल्या लोकसभेला विदर्भात दारुण पराभवाला समोर जावं लागणाऱ्या महायुतीने विदर्भात मुसंडी मारत घवघवीत यश मिळवले आहे. 

असे असले तरी विदर्भातील मतदारराजा ज्या पक्षाला निवडणुकीत पाठिंबा देता, तो पक्ष राज्यात सत्तेच्या सिंहासनी विराजमान होतो, असं राजकीय गणित असल्याचा एक समज आहे. दरम्यान,  विधानसभेच्या जागांच्या या प्रदेशात काँग्रेस आणि भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये मुख्य लढत होती. विशेष म्हणजे भाजप आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांमधील मुख्य लढती एकट्या विदर्भात आहेत. त्यामुळे दोन्हीही पक्ष विदर्भावर वर्चस्व राखण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावल्याचे बघायला मिळाले आहे. याच अनुषंगाने महायुती आणि मविआमध्ये विदर्भाच्या जागेवरून घमासान झाल्याचेही  बघायला मिळाले होते. ऐकुणात विदर्भ हा राज्याच्या राजकीय पटलावर महत्त्वाचा आणि निर्णायक ठरणार असल्याचे वेळोवेळी प्रकर्षाने दिसून आले आहे. दरम्यान आता तुमच्या मतदारसंघात किंवा तुमच्या गावाकडे कोण जिंकलं? कोणी गुलाल उधळला? आजपासून पुढच्या पाच वर्षांसाठी तुमचा आमदार कोण? यांची सविस्तर माहती जाणून घेऊ. 

विदर्भातील सर्व विजयी आमदारांची यादी 

  मतदारसंघ विजयी उमेदवार
 1  नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा देवेंद्र फडणवीस (भाजप)
2 नागपूर दक्षिण विधानसभा  मोहन मते (भाजप)
नागपूर पूर्व विधानसभा   कृष्णा खोपडे (भाजप)
नागपूर मध्य विधानसभा प्रविण दटके (भाजप)
नागपूर पश्चिम विधानसभा  विकास ठाकरे (काँग्रेस)
नागपूर उत्तर विधानसभा  डॉ. नितीन राऊत (काँग्रेस)
 काटोल विधानसभा चरणसिंग ठाकूर (भाजप)
कामठी विधानसभा चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)
उमरेड विधानसभा संजय मेश्राम (काँग्रेस)
10  सावनेर विधानसभा डॉ. आशिष देशमुख (भाजप)
11  हिंगणा विधानसभा समीर मेघे (भाजप) 
12  रामटेक विधानसभा  आशिष जयस्वाल (शिंदेसेना)
13 तुमसर राजू कारेमोरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
14 भंडारा नरेंद्र भोंडेकर (शिवसेना)
15 साकोली नानाभाऊ पटोले (काँग्रेस)
16 अ. मोरगाव राजकुमार बडोले (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
17 तिरोरा विजय रहांगडाले (भाजप)
18 गोंदिया विनोद अग्रवाल (भाजप)
19 आमगाव संजय पुरम (भाजप)
20 आरमोरी रामदास मेश्राम (काँग्रेस)
21 गडचिरोली मनोहर पोरेटी (काँग्रेस)
22 अहेरी धर्मरावबाबा आत्राम
23 राजुरा देवराव भोंगळे (भाजप) 
24 चंद्रपूर किशोर जोरगेवार (भाजप)
25  बल्लारपूर सुधीर मुनगंटीवार (भाजप)
26  ब्रह्मपूरी विजय वडेट्टीवार (काँग्रेस)
27  चिमुर बंटी भांगडिया (भाजप)
28 वरोरा करण देवतळे (भाजप)
30  वणी संजय दरेकर (शिवसेना – यूबीटी)
31  राळेगाव डॉ. अशोक उइके (भाजप)
32  यवतमाळ अनिल मंगूळकर (काँग्रेस)
33  दिग्रस पवन जयस्वाल (शिवसेना- यूबीटी)
34  आर्णी राजू तोडसाम (भाजप)
35  पुसद इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
36  अकोट प्रकाश भारसाकळे (भाजप)
37  बाळापूर नितीन देशमुख (शिवसेना- यूबीटी)
38  अकोला पश्चिम साजिद खान मन्नन खान (काँग्रेस)
39  अकोला पूर्व रणधीर सावरकर (भाजप)
41  मूर्तिझापूर हरिश पिंपळे (भाजप)
42  रिसोड अमित झनक (काँग्रेस)
43  वाशिम श्याम खोडे (भाजप)
44  कारंजा सई डहाके (भाजप)
45  धामणगाव रेल्वे प्रताप अडसड (भाजप)
46  बडनेरा रवी राणा (महायुती पुरस्कृत)
47  अमरावती सुलभा खोडके
48  तिवसा राजेश वानखेडे (भाजप)
49  दर्यापूर गजानन लवटे (शिवसेना – यूबीटी)
51  मेळघाट केवलराम काळे (भाजप)
50  अचलपूर प्रवीण तायडे
51 मोर्शी उमेश यावलकर (भाजप)
52 आर्वी सुमित वानखेडे (भाजप)
53 देवळी राजेश बकाने (भाजप)
54 हिंघणघाट समीर कुणावार (भाजप)
55 वर्धा डॉ. पंकज भोयर (भाजप)
56 बुलढाणा संजय गायकवाड (शिवसेना शिंदे)  
57 जळगाव जामोद  संजय कुटे (भाजप)
58 खामगाव  आकाश फुंडकर (भाजप)
59 चिखली  श्वेता महाले (भाजपा)
60 मेहकर  सिद्धार्थ खरात (शिवसेना ठाकरे)
61 मलकापूर  चैनसुख संचेती (भाजपा)
62 सिंदखेडराजा  मनोज कायंदे (अपक्ष)

विदर्भातील संपूर्ण 62 मतदारसंघाचा निकाल

१) चंद्रपूर - भाजप 5, काँग्रेस-1

2 )गडचिरोली -
भाजप -1
काँग्रेस -1
अजित पवार -1

3) अमरावती
भाजप 5, 
 युवा स्वाभिमान 1, अजित पवार 1, ठाकरे गट -1

4) यवतमाळ
भाजप - 3,
कॅाग्रेस 1, 
अजित पवार - 1, 
शिंदे - 1 
ठाकरेंची शिवसेना - 1 
 
5) गोंदिया
भाजप 3,
अजित पवार -1

6) भंडारा
भाजपा -1, 
शिंदे सेना १, 
अजित पवार १ 

7) अकोला
भाजप -3 
काँग्रेस -1
उद्धव ठाकरे -1

8) वर्धा
भाजप 4, 
कॅाग्रेस 0


9) बुलडाणा-  
भाजप 4, 
अजित पवार 1
 शिंदे 1,
उद्धव ठाकरे 1

10) नागपुर जिल्हा 
भाजप - 8
काँग्रेस - 3
शिंदे गट - 1


११) वाशिम 
भाजप 2
काँग्रेस -1

 

१)भाजपा- 39
२)शिवसेना शिंदे-4
३)राष्ट्रवादी अजित पवार -6
४)काँग्रेस-8
५)शिवसेना युबिटी- 4
६)राष्ट्रवादी शरद पवार - 0
७)मनसे - 0
८)इतर -1( युवा स्वाभिमान )


महायुती - 50 ( युवा स्वाभिमान सह )
मविआ-12
इतर

हे ही वाचा