Beed vidhansabha results 2024 : बीड : राज्याच्या राजकारणात बीड (Beed) जिल्हा यंदा मराठा आरक्षणाचं केंद्रस्थान राहिला आहे, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला याचा चांगलाच फटका बसला होता. मराठवाड्यातील 8 लोकसभा मतदारसंघांपैकी 7 मतदारसंघात भाजप महायुतीचा पराभव झाला. त्यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघातही भाजपच्या बड्या नेत्या असलेल्या पंकजा मुंडेंना पराभवाचा सामना करावा लागला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी चिन्हावर मराठा उमेदवार असलेल्या बजरंग सोनवणे यांनी 6500 मतांनी विजय मिळवला होता. त्यामुळे, यंदाच्या विधानसभा (Vidhansabha) निवडणुकीत येथे काय होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. बीड जिल्ह्यात एकूण 6 मतदारसंघ येतात. त्यामध्ये, परळी आणि माजलगावातील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे यांनी आघाडी घेतली आहे.
बीड जिल्ह्यात परळी, बीड, केज, माजलगाव, गेवराई आणि आष्टी विधानसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होत आहे. तर, बीड विधानसभा मतदारसंघात मनोज जरांगे समर्थक अनिल जगताप यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच, मराठा आरक्षण चळवळीतील नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनीही निवडणूक लढवली. त्यामुळे येथील लढतींकडे राज्याचे लक्ष आहे. त्यामुळे, विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येत असून बीड जिल्ह्यातील चित्र लवकरच स्पष्ट होईल. सध्या कोणी आघाडी घेतली आणि कोण पिछाडीवर आहे हे पाहता येईल.
बीडमधून सर्वात मोठी अपडेट; धनंजय मुंडे पहिल्या फेरी अखेर 3000 मतांनी आघाडीवर होते. मात्र, पहिल्या दोन फेरीत त्यांना 7168 मतांची आघाडी मिळाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर राजेसाहेब देशमुख यांना 5028 मतं मिळाली आहेत.
Disclaimer: निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. विजयी उमेदवारांची यादी अपडेट होत आहे. त्यानुसार बातमी रिफ्रेश करा. राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर
बीड जिल्ह्यातील विजयी उमेदवारांची यादी
1. परळी - धनंंजय मुंडे (140242 मताधिक्य)
2. बीड - संदीप क्षीरसागर (5764 मताधिक्य)
3. केज - नमिता मुंदडा (2687 मताधिक्य)
4. माजलगाव - प्रकाश सोळुंके (5899 मताधिक्य)
5. गेवराई - विजयसिंह पंडीत (42391 मताधिक्य)
6. आष्टी - सुरेश धस (77975 मताधिक्य)
परळीसह 6 मतदारसंघात चुरस, कोण कोणाविरुद्ध भिडतोय
1. परळी मतदारसंघात -
धनंजय मुंडे (NCP- AP) Vs राजेसाहेब देशमुख (NCP-SP)
2. बीड विधानसभा -
योगेश क्षीरसागर (NCP- AP) Vs संदीप क्षीरसागर (NCP-SP) Vs अनिल जगताप ( जरांगे समर्थक)
3. गेवराई विधानसभा -
विजयसिंह पंडित (NCP- AP) Vs बदामराव पंडित (शिवसेना-ठाकरे गट) Vs मयुरी मस्के (मनसे)
4. केज विधानसभा -
नमिता मुंदडा (भाजप) Vs पृथ्वीराज साठे (NCP-SP)
5. माजलगाव विधानसभा -
प्रकाश सोळंके (NCP-AP) Vs मोहन जगताप (NCP-SP) Vs रमेश आडसकर(अपक्ष)
6. आष्टी विधानसभा -
सुरेश धस (भाजप) Vs मेहबूब शेख (NCP-SP) Vs भीमराव धोंडे(अपक्ष)
2019 चे विजयी उमेदवार
गेवराई विधानसभा - लक्ष्मण पवार (भाजप)
माजलगाव विधानसभा - प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी - अजित पवार)
बीड विधानसभा - संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी - शरद पवार)
आष्टी विधानसभा - बाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी - अजित पवार)
केज विधानसभा - नमिता मुंदडा (भाजप)
233) परळी विधानसभा - धनंजय मुंडे (राष्ट्रवादी - अजित पवार)
हेही वाचा
बीड जिल्ह्यातील विधानसभेची खडाजंगी, बीड जिल्ह्यात 67 टक्के मतदान? वाढीव मतदाराचा कौल कुणाला